CoronaVirus: मास्कमध्येही मुंबईकरांची फॅशन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2020 04:28 AM2020-03-19T04:28:43+5:302020-03-19T04:29:01+5:30

मुंबईत प्रत्येक जण चेह-याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे. बाजारात मास्कमध्येही अनेक प्रकार उपलब्ध असल्याने, नागरिक आपल्या आवडीनुसार मास्कची खरेदी करत आहेत.

CoronaVirus: Mumbai's fashion in masks too | CoronaVirus: मास्कमध्येही मुंबईकरांची फॅशन

CoronaVirus: मास्कमध्येही मुंबईकरांची फॅशन

Next

- ओमकार गावंड
मुंबई : तोंडावाटे अथवा श्वसनातून कोरोनाचा संसर्ग होण्याचे प्रमाण जास्त असल्याने, खबरदारीचा उपाय म्हणून चेहऱ्यावर मास्क लावण्यावर भर दिला जात आहे. यामुळे मुंबईत प्रत्येक जण चेह-याला मास्क लावूनच घराबाहेर पडताना दिसत आहे. बाजारात मास्कमध्येही अनेक प्रकार उपलब्ध असल्याने, नागरिक आपल्या आवडीनुसार मास्कची खरेदी करत आहेत. एन ९५ मास्क, सर्जिकल मास्क, अँटी पोल्युशन मास्क, बाइक रायडिंग मास्क व साधा मास्क असे विविध प्रकारचे व विविध रंगांचे मास्क बाजारात उपलब्ध आहेत. यामध्ये लहान मुले, तसेच तरुणाईला आकर्षित करण्यासाठी अ‍ॅनिमेशन डिझाइन असलेले मास्क, तसेच भुताच्या दातांचे चित्र असलेले असलेले मास्क बाजारात उपलब्ध आहेत.
सुरुवातीला कोरोनाचे रुग्ण मुंबईत आढळले, त्या वेळेस नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. यामुळे नागरिकांनी मेडिकल, तसेच इतर दुकानांवर मास्क, हँडवॉश, तसेच सॅनिटायझर खरेदी करण्यासाठी गर्दी केली होती. त्यामुळे बाजारात मास्कचा प्रचंड तुटवडा भासू लागला. अनेकांनी ही संधी साधत कारखान्यांमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे डिझाइन असणारे व रंगीबेरंगी मास्क तयार करून ते बाजारात विक्रीस आणले. यामध्ये अगदी २० रुपयांपासून ते ५०० रुपयांपर्यंतचा मास्कही बाजारात उपलब्ध आहे. मेडिकलमध्ये उपलब्ध असणाºया एन ९५ व सार्जिकल मास्कचा वापर रुग्णालयात डॉक्टरांकडून केला जातो. अँटी पोल्युशन मास्क व बाइक रायडिंग मास्कचा वापर बाइक चालवताना अथवा जास्त धुळीच्या ठिकाणी केला जातो. साध्या मास्कचा वापर हा रस्त्याने चालताना अथवा प्रवासात केला जातो.
 

Web Title: CoronaVirus: Mumbai's fashion in masks too

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.