Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४८५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २७ जणांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Published: October 18, 2021 09:23 PM2021-10-18T21:23:19+5:302021-10-18T21:23:31+5:30

राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. 

Coronavirus In Maharashtra: 1,485 new coronavirus patients registered in the last 24 hours in the state; 27 death | Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४८५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २७ जणांचा मृत्यू

Coronavirus In Maharashtra: राज्यात गेल्या २४ तासांत १ हजार ४८५ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद; २७ जणांचा मृत्यू

Next

मुंबई: राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव गेल्या काही आठवड्यांपासून मोठ्या प्रमाणात कमी होत असल्याचे दिसून येत आहे. गेल्या २४ तासांत राज्यात १ हजार ४८५ नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर २७ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात २०७८ रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७.४ टक्के आहे. राज्याचा मृत्यूदर २.१२ टक्के झाला आहे. 

राज्यात सध्या २८ हजार ००८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. राज्यातील एकूण रुग्णांचा आकडा ६५,९३,१८२ वर पोहोचला आहे. तर आजवर ६४,२१,७५६ जणांनी कोरोनावर मात केली आहे. राज्यात आतापर्यंत १ लाख ३९ हजार ८१६ जणांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ६,११,१६,३५३ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६५,९३,१८२ (१०.७९ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात २,०८,६१३ व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर ९६१ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

दरम्यान, पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त ७८४३ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. जळगाव (१०), नंदूरबार (०),  धुळे (३), जालना (६९), परभणी (२८), हिंगोली (२२), नांदेड (१८),  अकोला (२५), अमरावती (१०), वाशिम (०७), अकोला (२२), बुलढाणा (१६), नागपूर (६१), यवतमाळ (०८),  वर्धा (४), भंडारा (१), गोंदिया (३), गडचिरोली (५) या  जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या १००च्या खाली आहे.
 

Web Title: Coronavirus In Maharashtra: 1,485 new coronavirus patients registered in the last 24 hours in the state; 27 death

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.