Coronavirus : वेळीच जाणा सोशल डिस्टन्सचे महत्त्व, एकमेकांपासून अंतर राखण्याचे आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 02:31 AM2020-03-24T02:31:29+5:302020-03-24T02:31:58+5:30

coronavirus : सोमवारी सकाळपासून सामान्यांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने प्रशासन यंत्रणांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सोशल डिस्टन्सचे महत्त्व जाणून सर्व सामान्यांनी अवलंबणे महत्त्वाचे आहे.

Coronavirus: The importance of social distance learning over time, an appeal to distance | Coronavirus : वेळीच जाणा सोशल डिस्टन्सचे महत्त्व, एकमेकांपासून अंतर राखण्याचे आवाहन

Coronavirus : वेळीच जाणा सोशल डिस्टन्सचे महत्त्व, एकमेकांपासून अंतर राखण्याचे आवाहन

Next

मुंबई : ‘कोरोना’ या जागतिक संकटाच्या काळात आपण एकत्र येऊन लढायला हवे असे सर्व स्तरातून सांगण्यात येत आहे. रविवारी जनता कर्फ्यूचे निर्देश प्रशासन यंत्रणांनी दिले होते. शिवाय, त्यानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीही जमावबंदीची मुदत वाढविल्याच्या सूचना दिल्या होत्या. मात्र तरीही सोमवारी सकाळपासून सामान्यांनी रस्त्यावर गर्दी करण्यास सुरुवात केल्याने प्रशासन यंत्रणांमध्ये तीव्र नाराजी आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर समाजात सोशल डिस्टन्सचे महत्त्व जाणून सर्व सामान्यांनी अवलंबणे महत्त्वाचे आहे.
याविषयी, ज्येष्ठ मानसोपचारतज्ज्ञ डॉ. यश गोस्वामी यांनी सांगितले, सध्या राज्य व देशासाठी अत्यंत कसोशीचा काळ आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसागणिक वाढत जातेय, त्यामुळे सरकार करत असलेले निर्देश पाळावेत. सामान्यांनी कुठेही जमाव, घोळक्यांनी राहू नये. शिवाय, कोरोनाची भीती न बाळगता आपापल्या घरी सुरक्षित रहावे. एकमेकांपासून अंतर राखावे. या काळात सर्वांचे शारिरीक व मानसिक स्वास्थ्य सुदृढ ठेवण्याचे आव्हान आहे. यात सामान्यांनी सहकार्य करुन सोशल डिस्टन्स पाळावा.

सोशल डिस्टन्सिंग म्हणजे काय?
जागतिक आरोग्य संघटना अर्थात जागतिक आरोग्य संघटनेच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार सध्या कुठल्याही व्यक्तीपासून एक मीटर किंवा तीन फूट अंतरावर असणे सुरक्षित आहे. त्यामुळेच गदीर्ची ठिकाणे जसे की बस, मेट्रो, लोकलमधून प्रवास करणे टाळा. लग्न आणि प्रार्थना समारंभासारखे सार्वजनिक कार्यक्रम त्यामुळेच रद्द होत करावेत.

Web Title: Coronavirus: The importance of social distance learning over time, an appeal to distance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.