Coronavirus:"...तर मुंबईत लॉकडाऊन होणार"; शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत

By प्रविण मरगळे | Published: February 24, 2021 05:34 PM2021-02-24T17:34:15+5:302021-02-24T17:41:56+5:30

Due to Corona Patients Increased Again Lockdown in Mumbai: कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारकडून हळूहळू नागरिकांना बंधनातून सूट दिली होती,

Coronavirus: if Corona Patients increased will be a lockdown in Mumbai Says Minister Aslam Sheikh | Coronavirus:"...तर मुंबईत लॉकडाऊन होणार"; शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत

Coronavirus:"...तर मुंबईत लॉकडाऊन होणार"; शहराचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी दिले संकेत

Next
ठळक मुद्देमुंबईतील जनजीवनाला पुन्हा एकदा कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यतामुंबईचा रुग्णवाढीचा दर ०.२२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे.शासनाकडून जे जे पर्याय आहेत ते शासन करतंय, परंतु मुंबईकरांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखावी

मुंबई – गेल्या काही दिवसांपासून राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने ठाकरे सरकारने पुन्हा कडक नियमावलींची अंमलबजावणी सुरू केली आहे, राज्यातील ठिकठिकाणी संचारबंदी, कलम १४४ लागू करून नागरिकांना मास्क घालणं बंधनकारक आहे अन्यथा कारवाईला सामोरं जा असा इशाराच प्रशासनाने दिला आहे, यात मुंबईतही दिवसेंदिवस कोरोना रुग्ण वाढत आहेत. (Guardian Minister Aslam Shaikh Statement on Mumbai Corona Patient Increased & Lockdown)  

कोरोना नियंत्रणात आल्यानंतर राज्य सरकारकडून हळूहळू नागरिकांना बंधनातून सूट दिली होती, परंतु कोरोना संपुष्टात आल्यासारखा नागरिक वागू लागले, मुंबईतील जनजीवनाला पुन्हा एकदा कोरोनामुळे ब्रेक लागण्याची शक्यता आहे. फेब्रुवारीपासून कोरोना रुग्णसंख्येत वाढ होऊ लागली आहे. मुंबईचा रुग्णवाढीचा दर ०.२२ टक्क्यांवर पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंता वाढली आहे. यातच मुंबईत पुन्हा लॉकडाऊन लागू करण्याचे संकेत पालकमंत्र्यांनी दिले आहेत.

याबाबत पालकमंत्री अस्लम शेख म्हणाले की, ज्याठिकाणी लग्न आहे तिथे ५० लोकांची परवानगी असताना ३०० लोकं उपस्थित राहतात, त्यांच्यावर कारवाई केली आहे, नाईट पबवर कारवाई केली आहे, मास्क न घालणाऱ्यांवर कारवाई सुरू केली आहे, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या हॉटेलचे परवाने रद्द केले आहेत. शासनाकडून जे जे पर्याय आहेत ते शासन करतंय, परंतु मुंबईकरांनीही स्वत:ची जबाबदारी ओळखावी, कोरोना रुग्णसंख्या वाढल्यास मुंबईत लॉकडाऊन करावं लागेल असे संकेत त्यांनी दिलेत.

तसेच मुंबईत इमारतींमध्ये कोरोनाबाधित रूग्ण सापडत आहेत, घरातील एक व्यक्ती बाधित झाल्यास इतरांची कोरोना चाचणी करण्यात येत आहे, चाचण्यांमध्ये इतरही सदस्य कोरोना बाधित असल्याचं आढळून येतंय, डिसेंबरपर्यंत कोरोना रुग्णवाढीचा दर घसरला होता, विशेष म्हणजे मुंबईच्या काही भागात हा रुग्णवाढीचा दर ०.३० टक्क्यांपर्यंत पोहचला आहे. त्यामुळे प्रशासनाची झोप उडाली आहे.

राज्यात २४ तासांत ६ हजारापेक्षा अधिक रूग्ण

राज्यात मंगळवारी दिवसभरात कोरोनाच्या ६ हजार २१८ रुग्णांचे निदान झाले असून ५१ मृत्यूंची नोंद झाली. सध्या ५३ हजार ४०९ रुग्ण उपचाराधीन असल्याची माहिती राज्याच्या आरोग्य विभागाने दिली. राज्यात मंगळवारी ५,८६९ रुग्ण बरे होऊन घरी गेले. तर, आजपर्यंत एकूण २०,०५,८५१ रुग्ण कोरोनामुक्त झाले. रुग्ण बरे होण्याचे हे प्रमाण ९४.९६ टक्के एवढे झाले आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.४५ टक्के आहे. दिवसभरात नोंद झालेल्या एकूण ५१ मृत्यूंपैकी ३२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर १२ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत.

Read in English

Web Title: Coronavirus: if Corona Patients increased will be a lockdown in Mumbai Says Minister Aslam Sheikh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.