coronavirus: निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू, उपाहारगृहांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: July 7, 2020 07:07 AM2020-07-07T07:07:36+5:302020-07-07T07:07:56+5:30

मुंबई : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून उर्वरित ठिकाणी, निवासी व्यवस्था असणारी हॉटेल्स , लॉज, गेस्ट हाऊस उघडण्यास ...

coronavirus: Hotels with accommodation starting July 8, no decision has been made yet about restaurants | coronavirus: निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू, उपाहारगृहांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही

coronavirus: निवास व्यवस्था असणारी हॉटेल्स ८ जुलैपासून सुरू, उपाहारगृहांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही

Next

मुंबई : राज्यातील प्रतिबंधित क्षेत्र (कंटेन्मेंट झोन) वगळून उर्वरित ठिकाणी, निवासी व्यवस्था असणारी हॉटेल्स, लॉज, गेस्ट हाऊस उघडण्यास राज्य सरकारने परवानगी दिली असून येत्या ८ जुलैपासून ही हॉटेल्स सुरू करता येतील. मात्र, एकूण क्षमतेच्या ३३ टक्के क्षमताच वापरण्याची अट घालण्यात आली आहे. रेस्टॉरंट किंवा उपाहारगृहांबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी राज्यातील हॉटेल व्यावसायिकांच्या प्रतिनिधींसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा केली होती. हॉटेल व्यवसायाला कार्यप्रणाली ठरवून देत ते सुरू करण्याची परवानगी देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले होते. त्यानुसार सोमवारी आदेश काढण्यात आला.
अटी आणि शर्थी
हॉटेल्स सुरू करायला परवानगी दिली असली तरी त्यासाठी कडक अटी देखील टाकण्यात आल्या आहेत. हॉटेल चालकांना गर्दी नियंत्रण, सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे लागणार आहे. प्रत्येकाचे थर्मल स्क्रीनिंग करावे लागेल. रिसेप्शन, रूम्स, लॉबी आदी सगळीकडे सॅनिटायझर ठेवावा लागेल.
हॉटेलमधील कर्मचा-यांना मास्क, ग्लोव्हज आदी सुरक्षा उपकरणे वापरणे बंधनकारक आहे. पेमेंटसाठी डिजिटल वॉलेट वापरावे लागतील. एअरकंडिशनचे तापमान देखील २४ ते ३० डिग्रीच्या दरम्यानच ठेवावे लागेल.

ग्राहकांवरही बंधने
ग्राहकांवरही काही बंधने असतील.आरोग्यसेतू अ‍ॅप डाऊनलोड करणे बंधनकारक आहे. कोणतीही लक्षणे नसलेल्या ग्राहकालाच प्रवेश मिळेल.मास्क लावलेल्या ग्राहकालाच प्रवेश मिळणार आहे.


 

Web Title: coronavirus: Hotels with accommodation starting July 8, no decision has been made yet about restaurants

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.