coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: May 27, 2020 02:33 PM2020-05-27T14:33:02+5:302020-05-27T14:36:21+5:30

कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अशा प्रकारचे राजकारण करू नये. आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. याचा विसर पडू देऊ नये.

coronavirus: Home Minister Anil Deshmukh criticizes Railway Minister Piyush Goyal BKP | coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका

coronavirus: संकटकाळातही भाजपाकडून होणारी गोरगरीबांची फसवणूक संताप आणणारी, काँग्रेसची घणाघाती टीका

googlenewsNext

मुंबई  - स्थलांतरीत मजुरांसाठीच्या श्रमिक स्पेशल रेल्वेगाड्यांवरून सध्या महाराष्ट्र सरकार आणि रेल्वे मंत्रालयामध्ये जोरदार राजकारण सुरू आहे. दरम्यान, आज महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी श्रमिक स्पेशल ट्रेनवरून रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांच्यावर जोरदार टीका केली आहे.  रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांचे पश्चिम बंगाल साठी सोडण्यात आलेल्या विशेष श्रमिक  रेल्वेगाड्यांबाबतचे विधान हे पूर्णपणे दिशाभूल करणारे आहे. वस्तुस्थितीला धरून नाही, असे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी म्हटले आहे.

पश्चिम बंगाल चे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांनी केंद्रीय रेल्वे प्रशासनास २२ मे रोजी पत्र लिहून असे कळविले होते की, २६ मे पर्यंत पश्चिम बंगालमध्ये कोणतीही रेल्वेगाडी पाठविण्यात येऊ नये. असे असताना देखील रेल्वे प्रशासनाने त्या पत्राकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून महाराष्ट्राची फजिती व्हावी, तारांबळ उडावी, यासाठी ३४ गाड्या काल दि.२६ रोजी महाराष्ट्रात पाठवल्या.

अशाप्रकारे महाराष्ट्राची फसवणूक करून केंद्रीय मंत्री पियुष गोयल बाहेर सांगत आहेत की, आम्ही महाराष्ट्रात गाड्या पाठवल्या, परंतु महाराष्ट्र सरकारने त्यात श्रमिकांना भरून त्या पश्चिम बंगालला पाठवल्या नाहीत. हे विधान पूर्णतः चुकीचे व दिशाभूल करणारे आहे. माझी गोयल यांना विनंती आहे की, कृपया कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आपण अशा प्रकारचे राजकारण करू नये. आपणही महाराष्ट्राचे सुपुत्र आहात. याचा विसर पडू देऊ नये.

Web Title: coronavirus: Home Minister Anil Deshmukh criticizes Railway Minister Piyush Goyal BKP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.