CoronaVirus: आशा सेविकांना मोठा दिलासा; मानधनात दोन हजारांची वाढ

By ऑनलाइन लोकमत | Published: June 26, 2020 04:24 AM2020-06-26T04:24:31+5:302020-06-26T07:00:11+5:30

आशा सेविकांच्या मानधनात प्रतिमहिना दोन हजार रुपये, तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा तीन हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला.

CoronaVirus: Great relief to Asha Seviks; Increase in honorarium by two thousand | CoronaVirus: आशा सेविकांना मोठा दिलासा; मानधनात दोन हजारांची वाढ

CoronaVirus: आशा सेविकांना मोठा दिलासा; मानधनात दोन हजारांची वाढ

Next

मुंबई : कोरोनाविरूद्धच्या लढ्यामध्ये पहिल्या फळीत कार्यरत असलेल्या महाराष्ट्रातील हजारो आशा सेविकांना महाराष्ट्र सरकारने मोठा दिलासा दिला आहे. आशा सेविकांच्या मानधनात प्रतिमहिना दोन हजार रुपये, तर आशा गटप्रवर्तकांच्या मानधनात दरमहा तीन हजार रुपये इतकी वाढ करण्याचा निर्णय गुरुवारी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. मानधनात वाढ करावी, अशी मागणी या सेविका बराच काळपासून करीत होत्या.
राज्यामध्ये ७१ हजार आशा सेविका आहेत. केंद्र सरकारने त्यांना दोन हजार रुपये वाढ दिली होती. राज्य सरकारनेही आता दोन हजार रुपये वाढवून देण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १५७ कोटी ७० लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला असून, तशी तरतूदही करण्यात आली आहे, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली.
>खासगी रुग्णवाहिका १०८ ला जोडणार
राज्यात अनेकांकडून रुग्णवाहिका मिळण्यास अडचणी येत असल्याच्या तक्रारी आल्यामुळे या रुग्णवाहिका १०८ क्रमांकाच्या दूृरध्वनी सेवेशी जोडण्यात येणार आहेत, अशीही माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. ते म्हणाले की,प्रति किलोमीटर दरही ठरवून देण्यात येणार आहेत. गरजूंना रुग्णवाहिका तात्काळ उपलब्ध करून देण्याचे आदेश सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत. ते त्याची अंमलबजावणी करतील.

Web Title: CoronaVirus: Great relief to Asha Seviks; Increase in honorarium by two thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.