coronavirus: उत्सव रद्द, मात्र पथकांनी केले दहीहंडीचे पूजन

By ऑनलाइन लोकमत | Published: July 6, 2020 02:04 AM2020-07-06T02:04:31+5:302020-07-06T02:04:31+5:30

सामाजिक भान बाळगून यंदा सर्वत्र लोकहितार्थ व साधेपणाने उत्सव होणार आहे. याचाच भाग म्हणून गुरुपौर्णिमेला रविवारी माझगावच्या श्रीदत्त क्रीडा मंडळाने टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले.

coronavirus: The festival was canceled, but the teams worshiped the Dahi handi | coronavirus: उत्सव रद्द, मात्र पथकांनी केले दहीहंडीचे पूजन

coronavirus: उत्सव रद्द, मात्र पथकांनी केले दहीहंडीचे पूजन

Next

मुंबई : दरवर्षी गुरुपौर्णिमेच्या मूहूर्तावर राज्यासह मुंबईतील दहीहंडी पथकांच्या सरावाचा आरंभ होतो. गुरुपौर्णिमेपासून शहर-उपनगरातील दहीहंडी पथकातील गोंविदा एकमेकांवर थर रचण्याचा कसून सराव करतात. याच सरावातून मागील काही वर्षांत या दहीहंडी उत्सवाने नऊ थरांचीही सलामी दिली होती. मात्र यंदा अन्य सण-उत्सवांप्रमाणेच कोरोनामुळे दहीहंडी उत्सवही रद्द झाल्याने यंदा ढाकुम्माकुमचा गजर होणार नाही.

सामाजिक भान बाळगून यंदा सर्वत्र लोकहितार्थ व साधेपणाने उत्सव होणार आहे. याचाच भाग म्हणून गुरुपौर्णिमेला रविवारी माझगावच्या श्रीदत्त क्रीडा मंडळाने टाटा रुग्णालयातील रुग्णांसाठी रक्तदान शिबिर आयोजित केले. गुरुपौर्णिमेला दहीहंडी समन्वय समितीचे अध्यक्ष व श्रीदत्त क्रीडा मंडळ या दहीहंडी पथकाचे प्रशिक्षक बाळा पडेलकर यांच्या नेतृत्वाखाली प्रथेप्रमाणे दहीहंडीचे पूजन करून हंडी बांधण्यात आली. या पूजनासाठी दहीहंडी पथकातील अनेक गोविंदानी हजेरी लावून उत्साह वाढविला.

याखेरीज, सर्व गोविंदांनी रक्तदानही केले. सामाजिक अंतर राखत माझगाव ताडवाडी येथील जनता केंद्र येथे टाटा रुग्णालयातील कर्करोग रुग्णांसाठी रक्तदान शिबिर घेण्यात आले. या शिबिरात जवळपास १००हून अधिक व्यक्तींनी रक्तदान करून कर्तव्य पार पाडले. याविषयी पडेलकर यांनी सांगितले, सुरुवातीला कायद्याच्या कचाट्यात अडकलेला उत्सव आपण अडथळे पार करून यशस्वी केला. यंदा हा उत्सव सामाजिक अंतर राखणे शक्य नसल्याने रद्द केला आहे. मात्र मंडळाने राबविलेल्या रक्तदान शिबिराप्रमाणे प्रत्येक पथकाने सामाजिक जबाबदारी ओळखून उपक्रम राबवावेत, आणि अशा
कठीण काळात समाजाचा आधार व्हावा. याखेरीज, उमरखाडी गोविंदा पथकानेही सरावाची हंडी बांधून गुरुपौर्णिमेची पूजा केली. 

Web Title: coronavirus: The festival was canceled, but the teams worshiped the Dahi handi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.