Coronavirus: दिलासादायक! राज्यातील १५ कोरोना रुग्ण विषाणूमुक्त; ८ जणांना मिळाला डिस्चार्ज

By ऑनलाइन लोकमत | Published: March 24, 2020 05:22 PM2020-03-24T17:22:00+5:302020-03-24T17:31:28+5:30

Coronavirus: आज राज्यातल्या कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचलाय

Coronavirus eight patient got discharged from kasturba hospital kkg | Coronavirus: दिलासादायक! राज्यातील १५ कोरोना रुग्ण विषाणूमुक्त; ८ जणांना मिळाला डिस्चार्ज

Coronavirus: दिलासादायक! राज्यातील १५ कोरोना रुग्ण विषाणूमुक्त; ८ जणांना मिळाला डिस्चार्ज

Next

मुंबई  : डॉक्टरांनी केलेल्या प्रयत्नांमुळे राज्यातील विविध  रुग्णालयातील १५ रुग्ण कोरोना विषाणूपासून मुक्त झाले आहेत. या विषाणूची लागण होऊ नये म्हणून सामान्यांनी घराबाहेर पडू नये, गर्दीत जाऊ नये तसेच विषाणूची लागण झाल्यास थेट रुग्णालयात भरती व्हावे, असे आवाहन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांचा आकडा वाढत चालला आहे. यानंतरही गर्दी करू नका, गर्दीत जाऊ नका, असे आवाहन करूनही नागरिक ऐकत नसल्याने सरकारने अखेर संचारबंदी लागू केली आहे. राज्यात मंगळवारी कोरोनाबाधितांचा आकडा १०७ वर पोहोचला आहे. 

राज्यात एकीकडे रुग्णांचा आकडा वाढत असताना रुग्णालयातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय आदी पालिकेचे कर्मचारी, अधिकारी रुग्ण बरे कसे होतील यासाठी प्रयत्न करत आहेत. पालिकेकडून केल्या जाणाऱ्या प्रयत्नांना चांगलेच यश आले आहे. गेल्या काही दिवसात कोरोना विषाणूची लागण झालेल्या १५ रुग्णांना बरे करण्यात आले आहे. त्यांच्या चाचण्यांमध्ये ते कोरोना निगेटिव्ह आले आहेत. यामुळे, पालिकेच्या आरोग्य विभागाला या रुग्णांना बरे करण्यात मोठे यश आले आहे. केंद्र आणि राज्य सरकाराच्या मार्गदर्शक तत्वांनुसार या १५ रुग्णांना लवकरच डिस्चार्ज दिला जाणार आहे.

असा होतो रुग्ण निगेटिव्ह
कोरोना विषाणूची लागण झालेला किंवा ज्याला लागण झाल्याचे संशय आहे, अशा रुग्णाला रूग्णालयात दाखल केले जाते. स्वॅबच्या साहाय्याने रुग्णाच्या घशातील लाळ घेऊन त्याची तपासणी करण्यात येते. त्यात तो रुग्ण पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्यावर उपचार केले जाते. रुग्णाला १४ दिवस रुग्णालयात ठेवले जाते. या कालावधीत त्या रुग्णाची रोग प्रतिकारक शक्ती वाढवली जाते. त्याला ताप, सर्दी, खोकला झाल्यास आवश्यक ती औषधे दिली जातात. या दरम्यान रुग्णाची अनेकदा तपासणी करण्यात येते. रुग्णाच्या दोन चाचण्या लागोपाठ निगेटिव्ह आल्यास तो रुग्ण बरा झाला आहे असे समजल्या जाते.

कस्तुरबा रुग्णालयातील आठ जणांना घरी सोडले
मुंबईतील कस्तुरबा रुग्णालयातील आठ रुग्ण कोरोना विषाणुमुक्त झाले असून त्यांना मंगळवारी घरी सोडण्यात आल्याची माहिती मुंबई पालिकेच्या आरोग्य विभागाने सांगितली. ही दिलासादायक बाब असून लोकांनी कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी घरीच सुरक्षित राहावे असून त्यांनी म्हटले आहे. घाटकोपर येथील झोपडपट्टीतील महिला कोरोना निगेटिव्ह झाली आहे, तिच्या ९ निकटवर्तीयांची कोरोना चाचणी केली होती. मात्र ती निगेटिव्ह आल्याचे आरोग्य विभागाने नमूद केले आहे.

Web Title: Coronavirus eight patient got discharged from kasturba hospital kkg

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.