coronavirus: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंमलबजावणीमुळे कोरोनाचा वेग मंदावला

By ऑनलाइन लोकमत | Published: October 29, 2020 02:36 AM2020-10-29T02:36:20+5:302020-10-29T02:36:33+5:30

Mumbai News : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कोरोनाचा वेग मंदावला

coronavirus: Coronavirus slowed down due to implementation of 'My family is my responsibility' | coronavirus: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंमलबजावणीमुळे कोरोनाचा वेग मंदावला

coronavirus: ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अंमलबजावणीमुळे कोरोनाचा वेग मंदावला

Next

मुंबई : पश्चिम उपनगरासह मुंबईत कोरोनाचा वाढीचा वेग मंदावला आहे. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या संकल्पनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे कोरोनाचा वेग मंदावला असल्याचे ठाम प्रतिपदान शिवसेनेचे प्रवक्ते आमदार, माजी महापौर सुनील प्रभू यांनी केले.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची माझे कुटुंब माझी जबाबदारी ही संकल्पना पालिकेच्या २४ वॉर्डमध्ये पालिका प्रशासन प्रभावीपणे राबवत आहे. सदर संकल्पना यशस्वी कऱण्यात शिवसेनेचे विभागप्रमुख, आमदार, नगरसेवक, पदाधिकारी व शिवसैनिक यांचाही मोठा वाटा आहे. या  सर्वांचे फलित म्हणून मुंबईतील कोरोना आता बऱ्यापैकी नियंत्रणात आहे, अशी माहिती आमदार सुनील प्रभू यांनी ‘लोकमत’ला दिली.
मात्र जोपर्यंत लस येत नाही तोपर्यंत प्रत्येकाने मास्क लावणे, सतत हात स्वच्छ धुणे व सोशल डिस्टन्सिंगचे पालन केल्यास कोरोनावर आपण निश्चित मात करू, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त 
केली.
 

Web Title: coronavirus: Coronavirus slowed down due to implementation of 'My family is my responsibility'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.