Coronavirus : नायर हॉस्पिटलमध्ये पंखा पडल्याने कोरोना योद्धा डॉक्टर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Published: May 20, 2020 05:24 PM2020-05-20T17:24:08+5:302020-05-20T17:25:43+5:30

Coronavirus : जखमी डॉक्टरला  दिवसभर इतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे. जखमी डॉक्टरची प्रकृती स्थिर आहे. 

Coronavirus : Corona Warriors doctor at Nair Hospital was injured when a fan fell on him | Coronavirus : नायर हॉस्पिटलमध्ये पंखा पडल्याने कोरोना योद्धा डॉक्टर जखमी

Coronavirus : नायर हॉस्पिटलमध्ये पंखा पडल्याने कोरोना योद्धा डॉक्टर जखमी

Next
ठळक मुद्देही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५. ४५ वाजता घडली असून वॉर्ड क्रमांक १२ मध्ये घडली. या डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडल्याने तो जखमी झाला.

मुंबई - नायर रुग्णालयामधील कोविड - १९ वॉर्डमध्ये ड्यूटीवर असलेल्या २६ वर्षीय डॉक्टर जखमी झाला. या डॉक्टरच्या डोक्यावर पंखा पडल्याने तो जखमी झाला. त्याला रुग्णालयाच्या इमर्जन्सी वॉर्डमध्ये दाखल करण्यात आले असून तेथेच त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

नायर रुग्णालयाचे डीन डॉ. मोहन जोशी म्हणाले, 'ही दुर्घटना मंगळवारी सायंकाळी ५. ४५ वाजता घडली असून वॉर्ड क्रमांक १२ मध्ये घडली. जखमी डॉक्टर अ‍ॅनेस्थेसिया विभागात निवासी डॉक्टर म्हणून कार्यरत आहे. डॉक्टरचे डोक्याचे सीटी स्कॅन केले होते, त्याचा रिपोर्ट नॉर्मल आला आहे. जखमी डॉक्टरला  दिवसभर इतर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली ठेवले आहे. जखमी डॉक्टरची प्रकृती स्थिर आहे. 

मंगळवारी महाराष्ट्रात कोरोनाची २१०० नवीन प्रकरणे नोंदली गेली असून एकूण प्रकरणे, ३७१५८ वर गेली आहेत अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली. मंगळवारी सलग तिसर्‍या दिवशी महाराष्ट्रात कोरोनाचे 2 हजाराहून अधिक रुग्ण आढळले आहेत. ते म्हणाले की, बुधवारी मुंबईत 1411 प्रकरणे नोंदली गेली आहेत. बुधवारी मुंबईत एकूण 43 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. संपूर्ण आकडेवारीबद्दल बोलायचे झाले तर मुंबईत कोरोनाचे एकूण रुग्ण 22563 वर पोचले आहेत. त्याचवेळी, कोरोनामुळे एकूण 800 लोकांनी प्राण गमावले आहेत.

 

कोरोना लसीच्या बहाण्याने ४ जणांना विष पाजलं; अनैतिक संबंधातून कुटुंबाला संपवण्याचा डाव

 

मोलकरणीच्या प्रेमात 'त्याने' आई-वडिलांसह, बहिण अन् पत्नीची केली हत्या

 

बापरे! आईचे अश्लील फोटो काढून केले ब्लॅकमेल, पोटच्या मुलानेच रचला निर्दयी कट

 

धक्कादायक! आश्रमात महिलांना बंदी बनवलं; बलात्काराच्या आरोपाखाली २ महंतांना अटक

 

Lockdown 4.0 : लॉकडाऊनमध्ये बेकायदा प्रवासी वाहतूक; बसचा भीषण अपघात

Web Title: Coronavirus : Corona Warriors doctor at Nair Hospital was injured when a fan fell on him

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.