coronavirus: बाधित एसटी कर्मचाऱ्यांची कोणीतरी विचारपूस करा, एसटी महामंडळाकडून विशेष सूचना

By ऑनलाइन लोकमत | Published: July 9, 2020 01:50 AM2020-07-09T01:50:31+5:302020-07-09T01:51:24+5:30

एसटी महामंडळाकडून कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे.

coronavirus: Ask someone about the affected ST employees, special instructions from the ST Corporation | coronavirus: बाधित एसटी कर्मचाऱ्यांची कोणीतरी विचारपूस करा, एसटी महामंडळाकडून विशेष सूचना

coronavirus: बाधित एसटी कर्मचाऱ्यांची कोणीतरी विचारपूस करा, एसटी महामंडळाकडून विशेष सूचना

Next

- कुलदीप घायवट

मुंबई - लॉकडाऊन सुरूझाल्यापासून अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची ने-आण करण्यासाठी एसटी कर्मचारी तत्पर आहे. मात्र हि सेवा देताना एसटी कर्मचा-यांना कोरोनाची लागण झाली. मुंबई विभागासह राज्यभरात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढू लागले. अनेक कर्मचारी आता रुग्णालयात, कोरोना विलगीकरण कक्षात दाखल झाले आहेत. मात्र त्यांची वरिष्ठ अधिका-याकडून कोणतीही विचारपूस केली जात नाही. औषध व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नसल्याची व्यथा एसटी कर्मचा-यांनी मांडली.

एसटी महामंडळाकडून कोरोनाबाधित एसटी कर्मचा-यांची विशेष काळजी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. मात्र आगारपातळीवर सूचनांकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा आरोप एसटी कर्मचारी संघटनेने केला आहे. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी करण्यासाठी विशेष काळजी आणि प्रतिबंधात्मक उपाय करण्याच्या सूचना एसटी महामंडळाने राज्यभरातील विभागांना पत्राद्वारे दिल्या आहेत. कोरोना विषाणूबाधित एसटी कर्मचाºयांना तत्काळ वैद्यकीय उपचार मिळण्याच्या दृष्टीने कार्यवाही करावी. कोरोनाबाधित एसटी कर्मचाºयांना मानसिक आधार द्यावा. विभाग नियंत्रक, कामगार अधिकारी, संबंधित आगाराच्या आगार व्यवस्थापकांनी वैयक्तिक लक्ष देऊन बाधित कर्मचाºयांची त्याच्या कुटुंबीयांची वारंवार चौकशी करून धीर द्यावा. कोरोनाबाधित कर्मचारी आढळल्यास त्याच्या संपर्कात आलेल्या कर्मचाºयांची वैद्यकीय तपासणी करून, वैद्यकीय सल्ल्यानुसार विलगीकरण करणे आवश्यक असल्यास त्यांचे तत्काळ
विलगीकरण कारण्याबाबत आरोग्य विभाग / स्थानिक प्रशासनास कळविण्यात यावे, अशा सूचना एसटी महामंडळाकडून राज्यभरातील आगारांना दिल्या होत्या.
मात्र अधिकारी वर्ग विचारपूस
करत नाही. अत्यावश्यक
सेवा देण्यासाठी बोलविण्यात येत होते.

१६८ कोरोनाबाधित कर्मचाºयांवर उपचार सुरू; ६५ कर्मचारी बरे
राज्यभरात ८ जुलैपर्यंत एकूण २३९ कर्मचारी कोरोनाबाधित झाले होते. मात्र यापैकी ६ जणांचा मृत्यू झाला. तर, १६८ कोरोनाबाधित कर्मचाºयांवर उपचार सुरु आहेत. तर ६५ कर्मचारी उपचार घेऊन बरे झाले आहेत.

आगार पातळीवर एसटीमधील कोरोनाबाधित कर्मचाºयांची साधी चौकशी केली जात नाही. जे उपचार घेत आहेत, त्यांना रुग्णालयातील अडचणींना सामोरे जावे लागत आहे. या अडचणी सोडविण्यासाठी मदत केली जात नाही. औषधे व इतर बाबींना आर्थिक मदत केली जात नाही.
- श्रीरंग बरगे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी कर्मचारी कॉंग्रेस

Web Title: coronavirus: Ask someone about the affected ST employees, special instructions from the ST Corporation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.