Coronavirus अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 18, 2020 03:10 AM2020-03-18T03:10:08+5:302020-03-18T03:11:36+5:30

आपत्कालीन परिस्थितीत निधीची चणचण भासू नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.  स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 

Coronavirus : Additional Commissioner, Deputy Commissioners Right to spend funds | Coronavirus अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार

Coronavirus अतिरिक्त आयुक्त, उपायुक्तांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार

Next

मुंबई : कोरोनाशी सामना करण्यासाठी मुंबई महापालिका सज्ज झाली आहे़ त्यानुसार, पालिका रुग्णालयात यंत्रणा सतर्क करण्यात आले आहे़ मात्र, आपत्कालीन परिस्थितीत निधीची चणचण भासू नये, यासाठी अतिरिक्त आयुक्त, उपायुक्त, सहायक आयुक्त आणि केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठातांना निधी खर्च करण्याचे विशेष अधिकार देण्यात आले आहेत.  स्थायी समितीच्या विशेष बैठकीत मंगळवारी याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. 
मुंबईत आढळलेल्या कोरोनाच्या रुग्णांना व त्यांच्या जवळच्या नातेवाइकांना कस्तुरबा रुग्णालयातील विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे़, तसेच परदेशातून प्रवास करून आलेल्या नागरिकांना त्यांच्याच घरात राहण्यास सांगून त्यांच्यावर लक्ष ठेवण्यात येत आहे़ पालिकेच्या डॉक्टारांचे पथक अशा लोकांची सतत विचारपूस करून १४ दिवस त्यांची नोंद ठेवणार आहे़ मात्र, अशा आपत्कालीन परिस्थितीत निधी कमी पडू नये, यासाठी विशेष खबरादारी घेण्याची सूचना नगरसेवकांनी केली होती़
यासाठी बोलावलेल्या स्थायी समितीच्या विशेष बैठकीत अतिरिक्त आयुक्त (पश्चिम) यांना पाच ते दहा कोटी रुपये खर्च करण्याचे अधिकार देण्यात आले ओहत़, तसेच उपायुक्त रमेश पवार आणि पराग मसूरकर यांना प्रत्येकी पाच कोटी खर्च करण्याचे अधिकार दिले आहेत. तसेच सर्व २४ विभागांचे सहायक आयुक्त आणि सर्व प्रमुख रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि २५ लाख तर केईएम रुग्णालयाचे अधिष्ठाता यांना ५० लाख खर्च करण्याची परवानगी देण्यात आली आहे़

सतर्कता, जनजागृतीसाठी पालिका फिरते दारोदार
मुंबई : दररोज दैनंदिन नागरी सेवांसाठी मुंबई महापालिकेच्या संपर्कात येणाऱ्या लाखो मुंबईकरांच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने महत्त्वाची पावले उचलली आहेत़ त्यानुसार, आरोग्यसेविका, वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे पथक दारोदार फिरून नागरिकांना सतर्क करीत आहेत़ गेल्या आठवड्याभरात पालिकेच्या पथकाने १० हजारांहून अधिक गृहनिर्माण सोसायट्यांमध्ये तपासणी केली आहे़
कोरोनाचे सात रुग्ण मुंबईत आढळून आल्यानंतर नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे़ त्यामुळे नागरिकांना खरी माहिती देऊन सतर्क व सुरक्षित करण्यासाठी पालिका कर्मचारी तोंडाला मास्क लावून दारोदार फिरत आहेत़ उच्चभू्र वस्ती असलेल्या मलबार हिल, नेपियन्सी रोड आणि वाळकेश्वर भागातील नागरिक परदेशातून प्रवास करून येण्याची शक्यता अधिक आहे़ त्यामुळे डी विभाग कार्यालयाने अशा प्रवाशांची नोंद ठेवून त्यांच्यावर लक्ष ठेवले आहे़
एम पश्चिम विभागात जनजागृतीची पोस्टर्स लावण्यात येत आहेत़ या पोस्टर्सच्या माध्यमातून काय करावे व काय करू नये, याची माहिती नागरिकांना दिली जात आहे़ दादर आणि माहिम परिसरात परदेशातून येणाºया प्रवाशांची संख्या तुलनेने अधिक आहे़ मात्र, नागरिक स्वत:हून पुढे येऊन परदेशातून आलेल्या प्रवाशांची माहिती देत असल्याचे आढळून आले आहे़ कुर्ल्यामध्येही नागरिक पालिकेच्या पथकाला सहकार्य करीत असल्याचे सांगण्यात आले़

व्हिडीओ कॉन्फरन्सिंग
विविध बैठकांसाठी पालिका मुख्यालयात नियमित येणाºया अधिकाºयांची संख्याही मोठी असते़ मात्र, त्यांनाही आता आपल्या कार्यालयांतूनच व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे संपर्क साधण्यास सांगण्यात आले आहे़

Web Title: Coronavirus : Additional Commissioner, Deputy Commissioners Right to spend funds

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.