Join us  

Corona Vaccination: मोठी बातमी! आता खासगी हॉस्पिटलमध्येही मिळणार कोरोना लस; मुंबईत ‘या’ रुग्णालयांना परवानगी

By प्रविण मरगळे | Published: March 02, 2021 10:32 PM

Coronavirus India Updates Centre directs states to operate all private hospitals as vaccination sites: केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांना कोरोना लस उपलब्ध होणार आहे.

ठळक मुद्देदुपारी १ वाजेपर्यंत १ कोटी ४८ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहेकोविड लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आता खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना लस मिळण्याची सुविधामुंबई महापालिकेने २९ खासगी रुग्णालयांना दिली कोरोना लसीकरणाची परवानगी

मूंबई – देशभरात लसीकरणाचा दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाल्यानंतर आता केंद्र सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या टप्प्यात सर्वसामान्य नागरिकांना लस मिळत असल्याने कोविड लसीकरण केंद्रावरील गर्दी टाळण्यासाठी आता खासगी हॉस्पिटलमध्येही कोरोना लस मिळण्याची सुविधा केंद्राने केली आहे. मंगळवारी केंद्र सरकारने सर्व राज्यातील खासगी रुग्णालयांना नागरिकांना लस देण्याची परवानगी दिली आहे.( Govt of India has just now permitted Corona vaccination to Private all Hospitals)  

केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे खासगी रुग्णालयात नागरिकांना कोरोना लस उपलब्ध होणार आहे. मंगळवारी दुपारी १ वाजेपर्यंत १ कोटी ४८ लाखाहून अधिक लोकांना कोरोनाची लस देण्यात आली आहे.  यापैकी २ लाख ८ हजार ७९१ लोक ६० वर्षापेक्षा जास्त वयाचे आहेत, तर इतर ४५-६० या वयोगटातील आहेत. आतापर्यंत कोविड लसीकरणासाठी ५० लाख लोकांनी नोंदणी केली आहे. मुंबईतही मुंबई महापालिकेकडून २९ खासगी रुग्णालयांना कोविड लसीकरण केंद्र उभारण्याची परवानगी देण्यात आली आहे. लसीकरण केंद्रावर होणारी गर्दी पाहता हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे.

पत्रकार परिषदेला संबोधित करताना आरोग्य विभागाचे सचिव राजेश भूषण म्हणाले की, देशातील काही राज्यांत सक्रीय रुग्णांच्या संख्येत वाढ होत असली तरी कोरोनामुक्त होणाऱ्यांचे प्रमाण ९७ टक्के इतके आहे, म्हणजे सक्रीय रुग्णांची संख्या २ टक्क्यापेक्षा कमी आहे. देशभरात कोविड १९ पूर्णपणे नियंत्रणात आहे असं त्यांनी सांगितले.

मुंबईत या खासगी रुग्णालयात मिळणार कोरोना लस

  1. सुश्रूषा हॉस्पिटल आणि रिसर्च सेंटर, विक्रोळी
  2. के. जे सोमय्या हॉस्पिटल
  3. डॉ. बालाभाई नानावटी हॉस्पिटल
  4. Wockkhardt हॉस्पिटल
  5. रिलायन्स फाऊन्डेशन हॉस्पिटल
  6. सौफी हॉस्पिटल
  7. हिंदुजा हॉस्पिटल
  8. एल. एच हिरानंदानी हॉस्पिटल
  9. कौशल्या मेडिकल फाऊंन्डेशन ट्रस्ट
  10. मसिना हॉस्पिटल
  11. हॉली फॅमिली हॉस्पिटल
  12. रहेजा हॉस्पिटल
  13. लिलावती हॉस्पिटल, वांद्रे
  14. गुरुनानक हॉस्पिटल
  15. बॉम्बे हॉस्पिटल
  16. ब्रीच कँडी हॉस्पिटल
  17. फोर्टिस हॉस्पिटल
  18. भाटीया जनरल हॉस्पिटल
  19. ग्लोबल हॉस्पिटल
  20. सर्वोदय हॉस्पिटल
  21. जसलोक हॉस्पिटल
  22. करूणा हॉस्पिटल
  23. एच जे दोशी घाटकोपर हिंदू सभा हॉस्पिटल
  24. SRCC बाल रुग्णालय
  25. कोकिळाबेन धीरूभाई अंबानी हॉस्पिटल
  26. कॉन्वेस्ट मंजुळा बदानी जैन हॉस्पिटल
  27. सुराणा सेठिया हॉस्पिटल
  28. हॉली स्पीरिट हॉस्पिटल
  29. टाटा हॉस्पिटल
टॅग्स :कोरोनाची लस