Join us

कोरोनामुळे ९३ कर्मचाऱ्यांचा मृत्यू, विम्यासाठी ८ जण पात्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2020 04:06 IST

मुंबई : कोरोनाच्या काळातही एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना काेराेनामुळे मृत्यू झाल्यास ...

मुंबई : कोरोनाच्या काळातही एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. या कर्मचाऱ्यांचा कर्तव्य बजावताना काेराेनामुळे मृत्यू झाल्यास ५० लाखांच्या विमा कवचाची घोषणा करण्यात आली आहे. राज्यात ३५०० एसटी कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली असून ९३ जणांचा मृत्यू झाला. यातील आठ जण विम्यासाठी पात्र ठरले आहेत. विम्यासाठी असणाऱ्या जाचक अटींत सुधारणा करण्याची कर्मचाऱ्यांची मागणी आहे.

.........................