राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ

By महेश गलांडे | Published: February 22, 2021 11:09 PM2021-02-22T23:09:25+5:302021-02-22T23:19:33+5:30

राज्यातीली कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत.

Corona growth continues in the state, with thousands still growing in mumbai | राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ

राज्यातील कोरोना वाढीचा वेग कायम, आजही हजारोंच्या संख्येत रुग्णवाढ

Next

मुंबई - महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर वाढायला सुरुवात झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी रविवारी जनतेशी संवाद साधून राज्यात कडक निर्बंध लादण्यात येत असल्याचे सांगितले. तसेच, जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत आदेशही दिल्याचेही ते म्हणाले. त्यामुळे, राज्यात जिल्हा प्रशासन आणि सर्वच जिल्ह्यातील पालकमंत्री पुन्हा सतर्क झाले आहेत. कोरोना रुग्णांची वाढती संख्या चिंतेचा विषय बनला आहे. राज्यात आज पुन्हा हजारोंच्या संख्येनं रुग्ण पॉझिटीव्ह आढळून आले आहेत. 

राज्यातीली कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 95 टक्क्यांपेक्षा अधिक होता. मात्र, तो आता कमी झाला आहे. राज्यात आज सोमवारी दिवसभारत 5,210 कोरोना बाधीत रुग्णांची वाढ झाली असून नवीन 5035 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. राज्यात एकूण 19,99,982 रुग्ण बरे होऊन दवाखान्यातून घरी पाठविण्यात आले आहेत. तर, एकूण 53,113 ऍक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 94.96% झाले आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरुन यासंदर्भात माहिती दिली. 

मध्य प्रदेश सरकारचा निर्णय

महाराष्ट्रातील रुग्णसंख्या वाढल्याने मध्य प्रदेशातीलशिवराज सिंह चौहान ( Shivraj Singh) सरकार अलर्ट मोडवर आले आहे. मध्य प्रदेश सरकारने नवी अ‍ॅडव्हायझरी जारी करत म्हटले आहे, की महाराष्ट्रातून येणाऱ्या प्रत्येकाची थर्मल स्क्रीनिंग होईल. याच बरोबर विनामास्क दिसणाऱ्या लोकांवर प्रभावी कारवाई करण्यात यावी, असा आदेशही शिवराज सरकारने दिला आहे. (Corona virus Madhya Pradesh shivraj singh govt advisory check temperature of people coming from maharashtra) राज्यातील गृह विभागाने भोपाळ, इंदौर, होशंगाबाद, बैतूल, सिवनी, छिंदवाडा, बालाघाट, बरवानी, खंडवा, खरगोन, बुरहानपूर, अलिराजपूर आणि महाराष्ट्राला लागून असलेल्या जिल्ह्यांच्या जिल्हाधिकाऱ्यांना सांगण्यात आले आहे, की त्यांनी डिस्ट्रिक्ट क्रायसिस मॅनेजमेन्ट कमिटीसोबत कोरोनाच्या स्थितीवर बैठक करावी.

दिल्लीत रिकव्हरी रेट वाढला

देशात महाराष्ट्रासह इतर काही राज्यांत कोरोना रुग्णांच्यासंख्येत वाढ होत असताना दिल्लीत मात्र कोरना रुग्णांची संख्या सातत्याने कमी होताना दिसत आहे. आरोग्य विभागाच्या ताज्या आकडेवारीनुसार दिल्लीतील कोरोना सक्रिय रुग्णांची संख्या 1071 वरून 1041 वर आली आहे. तसेच दिल्लीतील कोरोना संक्रमण दरही 0.3 टक्क्यांवर आला आहे. तर रिकव्हरी दर 98.12 टक्क्यांवर पोहोचला आहे. 

Web Title: Corona growth continues in the state, with thousands still growing in mumbai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.