वन्यजीव संशोधन, संवर्धनातील योगदानाचा होणार गौरव

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 04:36 AM2019-11-12T04:36:11+5:302019-11-12T04:36:15+5:30

‘पाणथळ जागा स्थलांतरित पाणपक्षी’ यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून २०१९ सालचे ‘सलीम अली अवॉर्ड फॉर नेचर कंझर्व्हेशन’ जाहीर केले आहेत.

The contribution of wildlife research, conservation will be honored | वन्यजीव संशोधन, संवर्धनातील योगदानाचा होणार गौरव

वन्यजीव संशोधन, संवर्धनातील योगदानाचा होणार गौरव

Next

मुंबई : बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी (बीएनएचएस) संस्थेने ‘पाणथळ जागा स्थलांतरित पाणपक्षी’ यावर आधारित आंतरराष्ट्रीय परिषदेचे औचित्य साधून २०१९ सालचे ‘सलीम अली अवॉर्ड फॉर नेचर कंझर्व्हेशन’ जाहीर केले आहेत. वन्यजीव संशोधन, संवर्धन आणि शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तीस हा पुरस्कार दिला जातो.
भारतीय पक्षीशास्त्रात अमूल्य योगदान देणाºया डॉ. सलीम अली यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ बीएनएचएस १९९६ सालापासून हे पुरस्कार जाहीर करते. सर्व विजेत्यांना मानचिन्ह, प्रशस्तिपत्र व रोख रक्कम देऊन गौरविण्यात येणार आहे. पुरस्कार प्रदान सोहळा परिषदेच्या शेवटच्या दिवशी म्हणजेच २२ नोव्हेंबर, २०१९ रोजी संपन्न होईल.
सलीम अली इंटरनॅशनल अवॉर्ड फॉर नेचर कंझर्व्हेशन, २०१९ हा पुरस्कार अलेक्झांडर लुईस पील, सलीम अली नॅशनल अवॉर्ड फॉर नेचर कंझर्व्हेशन, २०१९ - प्रा. माधव गाडगीळ यांना आणि सलीम अली सामुदायिक अवॉर्ड फॉर नेचर कंझर्व्हेशन, २०१९ हा पुरस्कार त्सुसेकी आणि लिंथुरे यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. याशिवाय जे.सी. डॅनिअल कंझर्व्हेशन लीडर अवॉर्ड फॉर यंग मेन, २०१९ हा अनंत पांडे यांना आणि जे.सी. डॅनिअल कंझर्व्हेशन लीडर अवॉर्ड फॉर यंग वुमेन, २०१९ हा पुरस्कार सोनाली गर्ग यांना मिळणार आहे.
अलेक्झांडर पील हे मागील दशकापासून लायबेरिया देशातील जैवविविधता आणि वारसा यांचे रक्षण आणि जतन करण्यामध्ये सक्रिय आहेत. आपली ही सामाजिक प्रतिमा निसर्ग संवर्धनासाठी वापरून देशातील पहिले ‘सापो राष्ट्रीय उद्यान’ आणि देशातील पहिली स्वयंसेवी संस्था ‘सोसायटी फॉर द कंझर्व्हेशन आॅफ नेचर आॅफ लायबेरिया’ (एससीएनएल) स्थापन केली. पील यांच्या चळवळीला प्रोत्साहन देण्यासाठी हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात येत आहे.
तर, पर्यावरणशास्त्रज्ञ, लेखक आणि पर्यावरण विज्ञान केंद्राचे संस्थापक प्रा. माधव गाडगीळ यांनी राष्ट्रीय धोरण तयार करण्यात सक्रिय भूमिका बजावली आहे. त्यांनी पश्चिम घाट परिसंस्था विज्ञान तज्ज्ञांच्या पॅनेलचे अध्यक्षपद भूषविले आहे, जे पुढे गाडगीळ कमिशन म्हणूनच प्रसिद्ध झाले. त्यांच्या भारतातील पर्यावरणाच्या संवर्धन कार्याची दखल घेऊन राष्ट्रीय विभागातील सलीम अली निसर्ग संवर्धन पुरस्कार, २०१९ प्रा. गाडगीळ यांना प्रदान करण्यात येणार आहे.
त्सुसेकी आणि लिंथुरे यांनी नागालँड राज्यातील दुर्गम भागात ‘भूतान ग्लोरी इको क्लब’ची स्थापना केली आहे. या इको क्लबच्या वतीने सामुदायिक जमिनीवर वृक्षलागवड मोहीम राबविल्या आहेत. या दोघांनी या भागातील वन्य जिवांची शिकार रोखण्यासोबतच तेथील समाजात संवर्धनाची भावना रुजवली. तरुण पिढीस शाश्वत पयार्याकडे नेले. या त्यांच्या कार्यास प्रोत्साहन देत बीएनएचएस सामुदायिक विभागातील सलीम अली निसर्ग संवर्धन पुरस्काराने त्सुसेकी आणि लिंथुरे यांना गौरविण्यात येणार आहे.
>निसर्ग संवर्धनातील कार्याचीही दखल
या वर्षीपासून बीएनएचएसने जे.सी. डॅनिअल कॉन्झर्व्हेशन लीडर अवॉर्ड फॉर यंग मेन अँड वुमेनची घोषणा केली आहे. निसर्ग संवर्धन क्षेत्रात प्रयत्नशील असणाºया तरुण महिला आणि पुरुष या दोन श्रेणींमध्ये पुरस्कार देण्यात येतील. हे दोन्ही पुरस्कार जे. सी. डॅनियल यांच्या स्मृतीस समर्पित आहेत. डॅनिअल यांचे नाव उभयचर, सरपटणारे प्राणी, पक्षी आणि सस्तन प्राण्यांसाठी एक तज्ज्ञ म्हणून ओळखले जाते. त्यांचे काम अनेक संशोधकांना प्रेरणा देणारे आहे. डॅनियल बीएनएचएसच्या संग्रहालयात सहाय्यक वैज्ञानिक म्हणून कार्यरत झाले होते आणि पुढे ते सोसायटीमध्ये क्युरेटर, संचालक, मानद सचिव आणि उपाध्यक्ष म्हणून काम केले.

Web Title: The contribution of wildlife research, conservation will be honored

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.