Join us  

काँग्रेस घालणार नोटाबंदीचे श्राद्ध - माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2017 1:18 AM

सांगली : नोटाबंदीच्या निर्णयाने देशाची अर्थव्यवस्था मोडकळीस आणली. येत्या ८ नोव्हेंबरला या निर्णयाला १ वर्ष पूर्ण होत असल्याने काँग्रेस या दिवशी जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाच्या कृतीचा निषेध करेल, अशी माहिती माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगलीत पत्रकार परिषदेत दिली.ते म्हणाले की, नोटाबंदीनंतर देशाच्या विकासाचा दर गतीने कमी होत गेला. आघाडी सरकारच्या कालावधीत असलेला ९.२ टक्क्यांचा विकास दर आता ५.७ टक्क्यांवर आला आहे. तज्ज्ञांच्या मते तो खरेतर २ टक्क्यांवर आहे. भाजपामधीलच काही नेते आता, नोटाबंदीमुळे सरकारची फसगत झाल्याचे कबूल करीत आहेत. तरीही पंतप्रधान ही गोष्ट कबूल करायला तयार नाहीत. तज्ज्ञांच्या मतानुसार देशातील काळा पैसा हा जमिनी, बोगस कंपन्या आणि विदेशी बँका या माध्यमातून अडकलेला आहे. रोखीच्या स्वरूपातील काळा पैसा हा अत्यंत नगण्य होता. तरीही सरकारने देशाचे ८६ टक्के चलन रद्द करून नवे आणले. त्यामुळे देशाच्या अर्थव्यवस्थेला धक्का देणारा हा निर्णय आहे. ८ नोव्हेंबर रोजी आम्ही जुन्या नोटांचे श्राद्ध घालून शासनाचा निषेध करू.कर्जमाफीच्या माध्यमातूनही सरकारने शेतकºयांना न्याय द्यायचे सोडून त्यांच्या सहनशीलतेशी खेळण्याचा प्रयत्न केला. अजूनही प्रक्रियेतील गोंधळ संपलेला नाही. त्यातच निकष ठरविताना विदर्भ आणि पश्चिम महाराष्टÑ असा भेद केला. वास्तविक, शेतकºयांच्या बाबतीत तरी असा भेद त्यांनी करायला नको होता, असे मतही चव्हाण यांनी व्यक्त केले.

टॅग्स :पृथ्वीराज चव्हाण