आयटीआयसाठी १ लाखाहून अधिक अर्ज निश्चिती

By ऑनलाइन लोकमत | Published: August 8, 2020 05:59 AM2020-08-08T05:59:30+5:302020-08-08T05:59:58+5:30

गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून फक्त ६ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज आत्तापर्यत निश्चित केले आहेत. तर सर्वाधिक ११ हजार ८१० अर्ज अमरावती विभागातून करण्यात आले आहेत.

Confirmation of more than 1 lakh applications for ITI | आयटीआयसाठी १ लाखाहून अधिक अर्ज निश्चिती

आयटीआयसाठी १ लाखाहून अधिक अर्ज निश्चिती

Next

मुंबई : राज्यात औद्योगिक प्रशिक्षण संस्थांमध्ये (आयटीआय) प्रवेशासाठी राबविण्यात येणाऱ्या प्रवेश प्रक्रियेला राज्यभरातून चांगला प्रतिसाद मिळत आहे. १ आॅगस्टपासून सुरू झालेल्या या प्रक्रियेत राज्यामध्ये सात दिवसांमध्ये आयटीआय प्रवेशासाठी तब्बल १ लाख ३ हजार ९३३ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.

गुरुवारी रात्री मिळालेल्या माहितीनुसार, मुंबईतून फक्त ६ हजार ९१२ विद्यार्थ्यांनी आपले प्रवेश अर्ज आत्तापर्यत निश्चित केले आहेत. तर सर्वाधिक ११ हजार ८१० अर्ज अमरावती विभागातून करण्यात आले आहेत. तर यंदाची कोरोनाची एकूण पार्श्वभूमी लक्षात घेता ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी पारंपरिक अभ्यासक्रमांना प्रवेश न घेता विभागातील कौशल्य अभ्यासक्रमांच्या दृष्टीने आयटीआयला पसंती दिल्याचे यावरून स्पष्ट होत आहे.
यंदा प्रवेशासाठी शासकीय आणि खाजगी आयटीआयमध्ये मिळून एकूण १ लाख ४५ हजार ५३२ जागा उपलब्ध असून यासाठीच्या अर्जाची नोंदणी १४ आॅगस्टपर्यंत सुरू राहणार आहे. रोजगारक्षम शिक्षणावर केंद्र सरकारसह राज्य सरकारचा भर असला तरी कौशल्याधारित अभ्यासक्रमाकडे मुंबई विभागातील विद्यार्थ्यांचा ओढा कमी असल्याचे दिसून येत आहे. मुंबई विभागातून सर्वात कमी ६९१२ विद्यार्थ्यांनी अर्ज भरले आहेत. त्यातील फक्त २९१२ विद्यार्थ्यांनी शुल्कासह विकल्प अर्ज भरले आहेत.

विभागनिहाय प्रवेश प्रक्रियेची आकडेवारी
अर्ज पूर्ण भरले शुल्क भरले विकल्प भरले
अमरावती ११८१० ८४७५ ५७५२
नाशिक ११५२३ ८४०१ ५१८०
पुणे १११२० ८३५७ ५४७८
औरंगाबाद १११११ ७८९८ ४८८३
नागपूर ९७८३ ६९८३ ४५४१
मुंबई ६९१२ ४९२५ २९१२
एकूण ६२२५९ ४५०३९ २८७४६

Web Title: Confirmation of more than 1 lakh applications for ITI

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.