Join us  

माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांना पत्नीशोक

By मनोहर कुंभेजकर | Published: February 21, 2023 9:01 PM

राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. 

मुंबई : उत्तर प्रदेशचे माजी राज्यपाल व माजी केंद्रीय मंत्री राम नाईक यांच्या पत्नी कुंदा नाईक (८४) यांचे आज सायंकाळी प्रदीर्घ आजाराने निधन झाले. त्यांच्या गोरेगाव (पूर्व) येथील लक्षचंडी अपार्टमेंट्स गोकुळधाम या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

आज रात्री १०.३० च्या सुमारास त्यांच्यावर शिवधाम स्मशानभूमी, पश्चिम द्रुतगती महामार्ग गोरेगांव (पू) येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार असल्याचे त्यांच्या निकटवर्तीयांनी सांगितले. त्यांच्या पश्चात त्यांचे पती राम नाईक, मुलगी विशाखा, निशिगंधा व नातू अँड. शार्दूल आहेत.

कुंदा नाईक या गोरेगाव येथील शाळेत शिक्षिका होत्या. त्यांनी नोकरी करत संसार नेटाने केला. त्यांच्या वडिलांच्या घरी स्वातंत्र्यवीर सावरकर येऊन गेले होते. त्यांना सावरकरांबद्धल नितांत अभिमान होता अशी माहिती त्यांच्या निकटवर्तीयांनी दिली.

टॅग्स :राम नाईकमुंबई