Join us  

सिद्धार्थ महाविद्यालयातील प्रभारी प्राचार्यांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 27, 2020 1:01 AM

या पार्श्वभूमीवर युवासेनेमार्फत आम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले आहे.

मुंबई : सिद्धार्थ विधि महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीचा निर्णय मुंबई विद्यापीठाने दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवल्याने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांवर तीन महिन्यांपासून उपासमारीची वेळ आली आहे. विद्यापीठाकडून प्रभारी प्राचार्यांची नियुक्तीच करण्यात न आल्याने अखेर बँकेने महाविद्यालयाचे बँक खाते गोठविल्याने प्राध्यापक व कर्मचाऱ्यांचे वेतनच काढण्यात येत नाही. त्यामुळे तीन महिन्यांपासून प्राध्यापक व शिक्षकांची अवस्था अत्यंत बिकट झाली आहे. या पार्श्वभूमीवर युवासेनेमार्फत आम्ही उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना पत्र लिहिले आहे.कुलगुरूंनी गांभीर्याने विचार करून प्रभारी प्राचार्य पदाचा निर्णय त्वरित घेऊन विद्यार्थी, कर्मचारी यांना न्याय द्यावा अशी अंगणी केल्याची माहिती युवासेना सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी दिली आहे. सिद्धार्थ विधी महाविद्यालयाच्या  प्रभारी प्राचार्य नियुक्तीचा निर्णय विद्यापीठाने दोन वर्षांपासून प्रलंबित ठेवला आहे. विद्यापीठाकडून महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यांच्या नियुक्तीसाठी समिती गठीत केली होती.