अतिरिक्त मार्गिकेसह रखडलेले प्रकल्प पूर्ण करा!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2019 02:20 AM2019-12-26T02:20:20+5:302019-12-26T02:20:40+5:30

वाढत्या गर्दीवर रेल्वे मंत्रालयाकडे उपाययोजना न सुचविणारे

Complete the project with additional guides! | अतिरिक्त मार्गिकेसह रखडलेले प्रकल्प पूर्ण करा!

अतिरिक्त मार्गिकेसह रखडलेले प्रकल्प पूर्ण करा!

Next

संकलन : कुलदीप घायवट

दररोज सकाळी ७ ते सकाळी ११ आणि सायंकाळी ५ ते १० वाजेपर्यंत लोकलमधील प्रवास हा धोकादायक ठरत आहे. लोकलचा प्रवास करताना अनेक प्रवाशांचा मृत्यू, तर काहींना कायमचे अपंगत्व येते. नुकतेच डोंबिवली येथील २२ वर्षीय चार्मी पासद हिचा लोकलमधून पडून मृत्यू झाला. या घटनेमुळे तरी प्रशासनाला जाग येणे आवश्यक आहे. रखडलेले प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे. रेल्वे प्रशासनाने वक्तशीरपणा वाढविल्यास, गर्दीचा लोंढा कमी होण्यास हातभार लागेल. जादा फेऱ्या, १५ डब्यांच्या लोकल वाढविणे आवश्यक आहे, अशी प्रतिक्रिया ‘लोकमत’ वाचकांनी ‘प्रवासी कट्टा’ या व्यासपीठावर व्यक्त केली.

ढिम्म व्यवस्थापन प्रवाशांच्या मृत्यूला जबाबदार
वाढत्या गर्दीवर रेल्वे मंत्रालयाकडे उपाययोजना न सुचविणारे आणि स्वत:ही वेळापत्रक, कामकाजाची शिस्त न पाळणारे मध्य रेल्वेचे ढिम्म व्यवस्थापन लोकलमधून पडून होणाºया प्रवाशांच्या मृत्यूला पूर्णपणे जबाबदार आहे. वाढलेल्या तिकीटविक्रीवरून वाढत्या प्रवाशांचा अंदाज घेत रेल्वेखात्याकडे त्या प्रमाणात जादा रेक्सची कुमक मागवून फेºया वाढविण्याचे प्रयत्न करणे स्थानिक व्यवस्थापनाकडून अपेक्षित असते. मात्र त्याकडे मध्य रेल्वेचे साफ दुर्लक्ष झाले आहे. कल्याणपुढे कर्जत, कसारा, खोपोली येथपर्यंत जादा लोकल, शटल सेवा सुरू करण्याची गरज ओळखून रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केल्यास प्रवाशांच्या समस्यांवर निश्चित मार्ग निघाले असते. - स्नेहा राज, गोरेगाव.

शटलसेवा सुरू करावी!
मुंबई-ठाणे परिसरात घरांच्या किमती परवडत नाहीत म्हणून कल्याण/विरार पलीकडे नागरीकरण वाढत आहे. पण त्याप्रमाणात तेथील वाहतुकीसाठी रेल्वेच्या गाड्यांची संख्या आणि वारंवारिता (फ्रिक्वेन्सी) वाढली नाही. लांब पल्ल्याच्या गाड्याही गर्दीच्या वेळी मुंबईत आणल्या जातात, पण त्यांच्या वेळा बदलणे शक्य आहे. निदान कल्याणपलीकडे शटल सेवा सुरू केल्यास प्रवाशांना चांगला दिलासा मिळेल. पश्चिम रेल्वेने ज्याप्रमाणे अंधेरी/विरार, बोरीवली/विरार, डहाणूपर्यंत लोकल सेवेची सोय केली, तशी ठाणे-कर्जत/कसारा, कल्याण-कर्जत/कसारा येथून लोकल सुरू केल्यास गर्दी विभागली जाऊन अपघात रोखता येतील. - राजन पांजरी, जोगेश्वरी.

अतिरिक्त मार्गिका हवी!
प्रवासी संख्या वाढत असतानाही त्याप्रमाणात उपनगरी गाड्यांची संख्या मर्यादित आहे. त्याला कारण उपलब्ध रेल्वे मार्गिकांची मर्यादा हे आहे. २००८मध्ये दिवा ते ठाणे हे १० किलोमीटरच्या अंतरात ५व्या आणि ६व्या मार्गिकेला मंजुरी मिळाली. आज ११ वर्षे होऊन गेले तरी हे काम झाले नाही. दिवा ते ठाणे, कुर्ला ते परळ आणि परळ ते सीएसएमटी या मार्गावर पाचव्या आणि सहाव्या मार्गिकेचे काम लवकर झाले पाहिजे. कल्याण टर्मिनस, तसेच कल्याण ते कसारा, कल्याण ते कर्जत मार्गावरही तिसºया आणि चौथ्या मार्गिकेचे काम लवकर पूर्ण झाले पाहिजे. कळवा ते ऐरोली मार्गाचे काम लवकर झाले पाहिजे. मध्य आणि पश्चिम रेल्वेला जोडणारा पनवेल ते विरार मार्ग लवकर पूर्ण करून तिथून उपनगरीय गाडी सुरू केली पाहिजे. उपनगरीय गाडीच्या फेºया वाढण्याची मर्यादा सर्व उपनगरीय लोकल १२ डब्यांऐवजी १५ डब्यांच्या केल्या पाहिजेत. थोड्याफार प्रमाणात गर्दीचे नियोजन होऊ शकते. - राजू साळवे, कसारा

गर्दीवर तोडगा काढा
आजकाल लोकल ट्रेनचा प्रवास म्हटला की, धडकी भरते. प्रत्येक स्थानक आणि लोकलमध्ये ओसंडून वाहणाºया गर्दीमुळे गुदमरायला होते. घणसोलीवरून नित्यनेमाने गेली दहा ते बारा वर्षे मुंबईच्या दिशेने प्रवास करत असताना कधी नव्हे इतका गर्दीने उच्चांक गाठलाय असे वाटायला लागते. दररोज प्रथम वाशी-ठाणे या ट्रान्सहार्बर व नंतर ठाण्यावरून सीएसएमटीकडे मध्य रेल्वेचा प्रवास करताना उलट दिशेकडून येणाºया गाड्या मात्र कमालीच्या रिकाम्या धावत असल्याचे निदर्शनास पडते. यातूनच या भरून वाहणाºया गर्दीवरील पर्यायदेखील सापडतो. मुंबई शहरामध्ये विशेषत: फोर्ट, कुलाबा, चर्चगेट, नरिमन पॉइंटपासून अंधेरीपर्यंत असणारी मोठमोठ्या कंपन्यांची कॉपोर्रेट कार्यालये, बँका, शासकीय व निमशासकीय कार्यालये यांकडे ही गर्दी रोजगारासाठी धाव घेत असते. जर यातील काही कार्यालये उपनगरांमध्ये स्थलांतरित केली तरी या गर्दीवर सोयीस्करपणे मार्ग काढता येऊ शकतो. यामुळे एक तर गर्दीचा समतोल साधता येईल व दुसरे म्हणजे दररोज रेल्वे प्रवासात जाणारे बळी व लूटमारी थोपवता येईल.
- वैभव पाटील, घणसोली.
 

 

Web Title: Complete the project with additional guides!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.