Join us  

महापालिकेविरोधात तक्रारी दीडपटीने वाढल्या!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2018 2:54 AM

मुंबई : मुंबई महापालिकेविरोधात मुंबईकरांच्या तक्रारींचा आकडा २०१५ ते २०१७ या दोन वर्षांत दीडपटीने वाढल्याची माहिती समोर आली आहे. प्रजा फाउंडेशनने गुरुवारी घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. पालिका व्यवस्थापनाला २०१७ साली एका तक्रारीचे निवारण करण्यास तब्बल सरासरी ४८ दिवस लागल्याचे फाउंडेशनने स्पष्ट केले.प्रजाने दिलेल्या माहितीनुसार, महापालिकेकडे २०१५ साली ६१ हजार ९१० तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. याउलट २०१७ साली हा आकडा ४९ टक्क्यांनी वाढून ९२ हजार ३२९ तक्रारींवर पोहोचला आहे. संतापजनक बाब म्हणजे २०१७ सालात मार्च ते डिसेंबर या कालावधीत प्रभाग समित्यांमध्ये ३८ नगरसेवकांनी कोणतेही प्रश्न उपस्थित केलेले नाहीत. सोबतच २०१५ साली महापालिका प्रशासनाकडून कोणत्याही तक्रारीचे निवारण करण्यासाठी सरासरी १५ दिवस लागत होते. मात्र २०१७ साली ही सरासरी ४८ दिवसांवर गेली आहे. अर्थात महापालिका प्रशासनाची कालबद्ध सेवांचा पुरवठा करणारी यंत्रणाच मोडकळीस आल्याचे दिसत आहे.१०० टक्के तक्रारींचे निवारणमहापालिकेतील तब्बल ४ वॉर्डमध्ये ९९ टक्के, तर एका वॉर्डमध्ये १०० टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. १०० टक्के तक्रारींचे निवारण झालेल्या वॉर्डमध्ये ई वॉर्डचा समावेश आहे. तर ए, डी, एफ नॉर्थ, जी साऊथ, एच वेस्ट या वॉर्डमध्ये ९९ टक्के तक्रारींचे निवारण झालेले आहे.येथे तक्रारी कमीमहापालिकेतील तक्रारींच्या संख्येत वाढ होत असली, तरी बहुतेक वॉर्डमधील तक्रारींची संख्या कमी झाल्याची माहिती आहे. तक्रारींची संख्या कमी झालेल्या वॉर्डमध्ये ए, डी, एफ साऊथ, एल, एम ईस्ट, पी साऊथ या वॉर्डचा समावेश आहे.नव्या बॅचने उपस्थित केले अधिक प्रश्नप्रभाग समितीच्या सभांमध्ये २०१२ सालच्या बॅचमधील नगरसेवकांहून २०१७ सालातील बॅचमधील नगरसेवकांनी अधिक प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी मार्च ते डिसेंबर २०१२ दरम्यान ६९७ प्रश्न विचारले होते. याउलट फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी मार्च ते डिसेंबर २०१७ दरम्यान ८५६ प्रश्न उपस्थित केले आहेत.के वेस्ट वॉर्डमध्ये सर्वाधिक तक्रारीमहापालिकेच्या २४ वॉर्डमधील के वेस्ट वॉर्डमधून सर्वाधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. के वेस्ट वॉर्डमध्ये एकूण ८ हजार ३४९ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्याखालोखाल शेजारीच असलेल्या एल वॉर्डमधून ७ हजार २८२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. एकंदरीत उपनगरांतून मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येते.सी वॉर्डमध्ये २ वर्षांत ७७ टक्क्यांनी वाढसी वॉर्डमधील तक्रारींमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ७७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे माहिती अधिकारात समजते. २०१५ साली सी वॉर्डमधून १ हजार ५२५ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यात २०१६ साली २५ टक्के वाढ होत १ हजार ८९९ तक्रारींची नोंद झाली. मात्र २०१७ साली तब्बल ५२ टक्क्यांनी तक्रारींच्या संख्येत वाढ होत तक्रारींचा आकडा थेट २ हजार ८९५ तक्रारींपर्यंत पोहोचला.८३ टक्के तक्रारींचा निपटारा२०१६ सालच्या तुलनेत २०१७ साली प्रशासनाने अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २०१६ साली फक्त ५८ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यात वाढ होत २०१७ साली प्रशासनाने ८३ टक्के तक्रारींचा निपटारा केला आहे.खड्ड्यांच्या तक्रारी घटल्यामहापालिकेकडील रस्त्यांसंदर्भातील तक्रारींत २०१७ साली घट झाल्याचे दिसते. २०१६ साली रस्त्यांसंदर्भात १३ हजार ४७५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१७ साली ११ हजार ६०६ तक्रारींइतकी घट झाल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे खड्ड्यांच्या तक्रारी तब्बल २९ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे. २०१६ साली खड्ड्यांसंदर्भात मुंबईकरांनी ५ हजार ८४१ तक्रारी केल्या होत्या, त्यात २०१७ साली ४ हजार १६४ इतकी घट झाली आहे.इमारत आणि परवान्याबाबतही तक्रारी : इमारत आणि परवाना विभागांतील तक्रारींत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. फेरीवाल्यांच्या परवान्यांवरून महापालिकेत झालेल्या तक्रारींत वाढ झाली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या आस्थापनांविषयीच्या तक्रारीही मोठ्या संख्येने येत आहेत.कचरा प्रश्न पेटतोय!मलनिस्सारण आणि घनकचरा व्यवस्थापन या विभागातील तक्रारींत मात्र झपाट्याने वाढ झाल्याची माहिती आहे. त्यात घरासमोरील कचरा उचलला नाही, तुंबलेली गटारे अशा विविध तक्रारींचा समावेश आहे.१०० टक्के तक्रारींचे निवारणमहापालिकेतील तब्बल ४ वॉर्डमध्ये ९९ टक्के, तर एका वॉर्डमध्ये १०० टक्के तक्रारींचे निवारण झाले आहे. १०० टक्के तक्रारींचे निवारण झालेल्या वॉर्डमध्ये ई वॉर्डचा समावेश आहे. तर ए, डी, एफ नॉर्थ, जी साऊथ, एच वेस्ट या वॉर्डमध्ये ९९ टक्के तक्रारींचे निवारण झालेले आहे.येथे तक्रारी कमीमहापालिकेतील तक्रारींच्या संख्येत वाढ होत असली, तरी बहुतेक वॉर्डमधील तक्रारींची संख्या कमी झाल्याची माहिती आहे. तक्रारींची संख्या कमी झालेल्या वॉर्डमध्ये ए, डी, एफ साऊथ, एल, एम ईस्ट, पी साऊथ या वॉर्डचा समावेश आहे.नव्या बॅचने उपस्थित केले अधिक प्रश्नप्रभाग समितीच्या सभांमध्ये २०१२ सालच्या बॅचमधील नगरसेवकांहून २०१७ सालातील बॅचमधील नगरसेवकांनी अधिक प्रश्न उपस्थित केल्याची माहिती आहे. फेब्रुवारी २०१२ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी मार्च ते डिसेंबर २०१२ दरम्यान ६९७ प्रश्न विचारले होते. याउलट फेब्रुवारी २०१७ मध्ये निवडून आलेल्या नगरसेवकांनी मार्च ते डिसेंबर २०१७ दरम्यान ८५६ प्रश्न उपस्थित केले आहेत.के वेस्ट वॉर्डमध्ये सर्वाधिक तक्रारीमहापालिकेच्या २४ वॉर्डमधील के वेस्ट वॉर्डमधून सर्वाधिक तक्रारींची नोंद करण्यात आली आहे. के वेस्ट वॉर्डमध्ये एकूण ८ हजार ३४९ तक्रारी नोंदवण्यात आल्या असून त्याखालोखाल शेजारीच असलेल्या एल वॉर्डमधून ७ हजार २८२ तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. एकंदरीत उपनगरांतून मोठ्या संख्येने तक्रारी प्राप्त होत असल्याचे निदर्शनास येते.सी वॉर्डमध्ये २ वर्षांत ७७ टक्क्यांनी वाढसी वॉर्डमधील तक्रारींमध्ये गेल्या दोन वर्षांत तब्बल ७७ टक्क्यांनी वाढ झाल्याचे माहिती अधिकारात समजते. २०१५ साली सी वॉर्डमधून १ हजार ५२५ तक्रारी नोंदवण्यात आल्या होत्या. त्यात २०१६ साली २५ टक्के वाढ होत १ हजार ८९९ तक्रारींची नोंद झाली. मात्र २०१७ साली तब्बल ५२ टक्क्यांनी तक्रारींच्या संख्येत वाढ होत तक्रारींचा आकडा थेट २ हजार ८९५ तक्रारींपर्यंत पोहोचला.८३ टक्के तक्रारींचा निपटारा२०१६ सालच्या तुलनेत २०१७ साली प्रशासनाने अधिक तक्रारींचे निवारण केले आहे. २०१६ साली फक्त ५८ टक्के तक्रारींचे निवारण करण्यात प्रशासनाला यश आले होते. त्यात वाढ होत २०१७ साली प्रशासनाने ८३ टक्के तक्रारींचा निपटारा केला आहे.खड्ड्यांच्या तक्रारी घटल्यामहापालिकेकडील रस्त्यांसंदर्भातील तक्रारींत २०१७ साली घट झाल्याचे दिसते. २०१६ साली रस्त्यांसंदर्भात १३ हजार ४७५ तक्रारी दाखल झाल्या होत्या. २०१७ साली ११ हजार ६०६ तक्रारींइतकी घट झाल्याची माहिती आहे. विशेष बाब म्हणजे खड्ड्यांच्या तक्रारी तब्बल २९ टक्क्यांनी कमी झाल्याची माहिती आहे. २०१६ साली खड्ड्यांसंदर्भात मुंबईकरांनी ५ हजार ८४१ तक्रारी केल्या होत्या, त्यात २०१७ साली ४ हजार १६४ इतकी घट झाली आहे.इमारत आणि परवान्याबाबतही तक्रारी : इमारत आणि परवाना विभागांतील तक्रारींत मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे समोर आले आहे. फेरीवाल्यांच्या परवान्यांवरून महापालिकेत झालेल्या तक्रारींत वाढ झाली आहे. विनापरवाना सुरू असलेल्या आस्थापनांविषयीच्या तक्रारीही मोठ्या संख्येने येत आहेत.

टॅग्स :मुंबई महानगरपालिका