Join us

सागरी जलचरांच्या अभ्यासासाठी समिती- मालवण : वाईल्ड लाईफ प्रोटेक्शन

By admin | Updated: August 8, 2014 23:01 IST

वनविभागाची मोहीम : अहवाल शासनाला सादर करणार

अ‍ॅक्ट १९७२ अंतर्गत समुद्रकिनाऱ्यांवरील वर्ग एक व दोनमधील संरक्षित सागरी प्रजातींबाबत शासन धोरण निश्चित करणार आहे. यासाठी केंद्रीय मत्सिकी संशोधन संस्थेवर (सीएमएफआय) सागरी जलचरांचा अभ्यास करून त्याचा अहवाल शासनाला सादर करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वनविभागामार्फत ही विशेष मोहीम राबविण्यात येणार असून संरक्षित सागरी प्रजातींच्या मृत्यूच्या नेमक्या कारणांचाही या अंतर्गत अभ्यास करण्यात येणार आहे.केंद्रीय वने व पर्यावरण मंत्रालय, युएनडीपी, कांदळवन विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने सिंधुदुर्ग जिल्ह्यात सुरू असलेल्या सागरी जैव विविधतेचे संवर्धन व तिचा शाश्वत वापर या प्रकल्पाअंतर्गत सागरी जैव साधनसंपत्ती टिकवून ठेवण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे. यांत्रिकी मासेमारीचे मत्स्य व्यवसायावर झालेले दुष्परिणाम, सागरी प्रदूषणामुळे संरक्षित प्रजातींवर होणारे दूरगामी परिणाम रोखून सागरी पर्यावरणाची साखळी अबाधित ठेवण्यासाठी महाराष्ट्र सागरी अधिनियमात महत्त्वपूर्ण बदल होणार आहेत. जलचरांच्या मृत्यूमागची नेमकी कारणे शोधून त्यावर संशोधन करण्याची जबाबदारी केंद्रीय मत्स्यकी संशोधन केंद्रावर सोपविण्यात आली आहे. सीएमएफआयच्या अहवालानंतर शासन पुढील कार्यवाही करणार आहे. किनारपट्टीवर संरक्षित सागरी प्रजाती मृत आढळल्यास वनविभागाला माहिती देण्यासाठी यंत्रणा उभी केली जाणार आहे. या विशेष मोहिमेसाठी वनविभागाच्या डहाणू, ठाणे, अलिबाग, रोहा, चिपळूण व सावंतवाडी विभागाच्या अधिकाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. यामध्ये ५३ अधिकारी व ९० स्थानिक मच्छिमारांना आतापर्यंत प्रशिक्षित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणाअंतर्गत किनाऱ्यांवर आढळणाऱ्या जखमी जलचरांना उपचार करणे तसेच मृत जलचरांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्याबाबतही मार्गदर्शन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)डॉल्फीन, व्हेल माशांवर विशेष लक्षसिंधुदुर्ग जिल्ह्याच्या समुद्री भागात ३० प्रकारच्या सागरी संरक्षित प्रजाती आढळून येतात. सुरूवातीच्या टप्प्यात डॉल्फीन व व्हेल माशांवर विशेष लक्ष केंद्रीत केले आहे. जलचरांमध्ये कॉमन डॉल्फीन, बॉटल नोझ डॉल्फीन हंपबॅक डॉल्फीन, स्पर्म व्हेल व हंपबॅक व्हेल प्रजाती आढळतात.गेल्या काही वर्षात संरक्षित प्रजातींच्या मृत्यूमध्ये वाढ झाल्याचे दिसून आले आहे.