ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: May 1, 2020 12:44 PM2020-05-01T12:44:22+5:302020-05-01T12:48:46+5:30

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते

The commission has decided that the election of the Legislative Council will be held on May 22 2020 MMG | ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

ठरलं; महाराष्ट्र विधानपरिषदेच्या 9 जागांसाठी 21 मे रोजी निवडणूक, उद्धव ठाकरेंसह सरकारला दिलासा

Next

मुंबई - भारतीय निवडणूक आयोगाने राज्यातील विधानपरिषेच्या निवडणुकी घेण्याची परवानगी दिल्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या आमदरकीचा मार्ग मोकळा झाला आहे. विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. त्यानुसार, विधानपरिषदेची निवडणूक घेण्यात येईल, असे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले असून २१ मे रोजी ही निवडणूक पार पडणार असल्याचे निवडणूक आयोगाने स्पष्ट केले आहे.  

विधान परिषदेच्या रिक्त जागांसाठी तातडीने निवडणुका घेण्याबाबत आपण निवडणूक आयोगाकडे शिफारस करावी, असे पत्र मुख्यमंत्री ठाकरे यांनी गुरुवारी राज्यपालांना पाठवले होते. याच पत्राचा आधार घेत राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी निवडणूक आयोगाला पत्र पाठवले होते. २४ एप्रिल पासून राज्यातील विधान परिषदेच्या ९ जागा रिक्त आहेत. तसंच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे दोन्ही सभागृहांचे सदस्य नाहीत. त्यामुळे लवकरात लवकर निवडणुका घेण्याची विनंती राज्यपाल यांनी निवडणुक आयोगाला केली होती. राज्यपालांच्या या विनंतीनंतर निवडणुक आयोगाने राज्यातील विधान परिषच्या निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. आता, राज्यातील ९ जागांंसाठी घेण्यात येणार्या या निवडणुका २१ मे रोजी पार पडणार आहे. 

भारतीय निवडणूक आयोगाने (ईसीआय) महाराष्ट्रातील विधान परिषद (एमएलसी) निवडणुका घेण्यास परवानगी दिली आहे. मात्र, या  निवडणुकांदरम्यान कोरोनाचा विचार करता सुरक्षेसाठी आवश्यक मार्गदर्शक तत्त्वे सुनिश्चित करणे आवश्यक असल्याचे निवडणुक आयोगाने स्पष्ट केले आहे. त्यानंतर, शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभार मानले आहेत, तसेच राज्यातील राजकीय अनिश्चिततेच्या वातावरणाचा धुरळा खाली बसेल, असेही म्हटले. महाराष्ट्राची पुण्याई मोठी म्हणून महाराष्ट्र दिनी हा निर्णय आला, असे म्हणत संजय राऊत यांनी केंद्र सरकारचे आभारही मानले आहेत. 

Web Title: The commission has decided that the election of the Legislative Council will be held on May 22 2020 MMG

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.