Join us  

दिलासादायक; राज्यात दैनंदिन रुग्णसंख्येत मोठी घट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 4:07 AM

दिवसभरात ३७ हजार ३२६ नाबाधितांची नाेंद; रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिकलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यात ...

दिवसभरात ३७ हजार ३२६ नाबाधितांची नाेंद; रुग्ण निदानाच्या तुलनेत कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यात सोमवारी दैनंदिन रुग्णांमध्ये मोठी घट झालेली दिसून आली, तर दुसरीकडे दिवसभरात कोरोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक असल्याचे दिसून आले आहे. राज्यात साेमवारी दिवसभरात ३७ हजार ३२६ रुग्ण आणि ५४९ मृत्यूंची नोंद झाली आहे. काही दिवसांपूर्वीच दैनंदिन रुग्णसंख्या ६० हजारांच्याही पुढे गेले हाेती. दुसरीकडे दिवसभरात ६१ हजार ६०७ रुग्णांनी कोरोनावर मात केली असून आतापर्यंत ४४ लाख ६९ हजार ४२५ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.

राज्यात रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ८६.९७ टक्के असून मृत्यूदर १.४९ टक्के आहे. सध्या राज्यात ५ लाख ९० हजार ८१८ रुग्ण उपचाऱाधीन आहेत, अशी माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या २ कोटी ९६ लाख ३१हजार १२७ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी १७.३४ टक्के नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. राज्यात ३६ लाख ७० हजार ३२० व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत, तर २६ हजार ६६४ व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.

राज्यात एकूण ५१ लाख ३८ हजार ९७३ कोरोनाबाधित असून मृतांचा आकडा ७६ हजार ३९८ आहे. दिवसभरात नोंद झालेल्या ५४९ मृत्यूंपैकी ३०२ मृत्यू हे मागील ४८ तासांतील तर ११३ मृत्यू हे मागील आठवड्यातील आहेत. उर्वरित १३४ मृत्यू हे एक आठवड्यापेक्षा अधिक काळापूर्वीचे आहेत.

पुण्यातील उपचाराधीन रुग्ण एक लाखांच्या खाली

जिल्हाउपचाराधीन रुग्ण

पुणे ९७५९३

नागपूर ५६४५८

मुंबई ४७०५४

ठाणे ३४१८५