शिरोशी - कल्याण -नगर हायवेवरील हनुमान ढाबा येथील पुलाचे कठडे तुटल्याने मोठा अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. यामुळे वाहन पुलावरून खाली पडण्याची भीती आहे. या पुलाचे कठडे जवळ - जवळ ४ ते ५ महिन्यांपासून तुटले आहेत. हायवेवरील खडड्यांचे प्रमाण वाढत चालल्याने अपघातही वाढले आहेत. या पुलाच्या साईट कठड्यांना बांबूचे काठ्या लावून कुंपण करण्यात आले आहे. याबाबत, उपविभाग अभियंता, राष्ट्रीय महामार्ग विभाग मुख्यालय मुरबाड कार्यालय पी.ई. दळवी यांच्याशी संपर्क साधला असतात्यांनी सांगितले की, पुलाचे काम लवकरच सुरू करण्यात येईल़(वार्ताहर / राजेश भांगे)
पुलाचा कठडा तुटल्याने अपघाताची शक्यता
By admin | Updated: May 12, 2014 22:51 IST