Join us  

बंद गटविमा योजनेला संजीवनी मिळणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 2:26 AM

पालिका कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आरोग्य गटविमा योजना बंद पडली आहे. गटविम्याचे काम करणा-या कंपनीने वाटाघाटी करण्यास नकार दिल्यानंतर ही योजना रखडली.

मुंबई : पालिका कर्मचाऱ्यांसाठी लागू करण्यात आलेली आरोग्य गटविमा योजना बंद पडली आहे. गटविम्याचे काम करणा-या कंपनीने वाटाघाटी करण्यास नकार दिल्यानंतर ही योजना रखडली. यामुळे युनायटेड इन्श्युरन्स कंपनीविरोधात कायदेशीर कारवाई करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे.पालिका अधिकाºयांसाठी १८ वाहने खरेदी करण्याचा प्रस्ताव स्थायी समितीच्या पटलावर मंजुरीसाठी प्रशासनाने आणला होता. मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या गटनेत्या राखी जाधव यांनी अधिकाºयांसाठी गाड्या घेण्यात येतात, पण पालिका कर्मचाºयांची आरोग्य गटविमा योजना बंद करण्यात आल्याबाबत नाराजी व्यक्त केली. या गटविम्याअभावी कर्मचाºयांचे हाल होत आहेत. त्यामुळे ही योजना पुन्हा सुरू करण्याची मागणी सदस्यांनी केली.या योजनेबाबत पुढील बैठकीपूर्वी निर्णय घ्यावा, असे निर्देश स्थायी समितीचे अध्यक्ष रमेश कोरगावकर यांनी प्रशासनाला दिले.>कायदेशीर कारवाईगेल्या वर्षीच्या तुलनेत ४० टक्के रक्कम वाढवून देऊनही विमा कंपनी सेवा देण्यास तयार नाही. वाटाघाटी करूनही ते तयार नसल्यामुळे त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येत असल्याची माहिती अतिरिक्त आयुक्त आबासाहेब जºहाड यांनी दिली. याबाबत लवकरच ठोस निर्णय घेतला जाईल, असे आश्वासनही त्यांनी स्थायी समितीला दिले.