‘पॉर्न’वर क्लिक करणे ठरेल धोक्याचे; सायबर पोलिसांचे आवाहन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 02:25 AM2020-05-26T02:25:37+5:302020-05-26T02:25:59+5:30

ऑनलाइन भामट्यांकडून होतेय फसवणूक

Clicking on ‘porn’ would be dangerous; Cyber police appeal | ‘पॉर्न’वर क्लिक करणे ठरेल धोक्याचे; सायबर पोलिसांचे आवाहन

‘पॉर्न’वर क्लिक करणे ठरेल धोक्याचे; सायबर पोलिसांचे आवाहन

Next

मुंबई : लॉकडाउनच्या काळात इंटरनेटचा वापर करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. त्यामध्ये मध्यमवयीन व्यक्तींचा मुख्यत: समावेश आहे. बºयाचदा चुकून किंवा कुतूहलापोटी पोर्नोग्राफिक संकेतस्थळावर क्लिक करतात. कालांतराने त्यांना संदेश आणि ईमेलमध्ये तुम्ही जे पाहत आहात ते व्हायरल करू, अशी धमकी देत पैसे उकळण्याच्या घटना डोकेवर काढत आहेत. त्यामुळे अशा संकेतस्थळांपासून दूर राहण्याचे आवाहन सायबर महाराष्ट्रकडून करण्यात येत आहे.

लॉकडाउनच्या काळात सायबर भामटे, गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत. राज्यातील विविध पोलीस ठाण्यात एकूण ४१९ गुन्ह्यांची (ज्यापैकी २५ ठ.उ आहेत) नोंद २४ मेपर्यंत झाली आहे. यात आक्षेपार्ह व्हॉट्सअ‍ॅप मेसेजेस फॉरवर्ड केल्या प्रकरणी १७५ गुन्हे दाखल झाले आहेत, तर आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट्स शेअर केल्या प्रकरणी १६५ गुन्हे दाखल करण्यात आले आहेत, टिकटॉक व्हिडीओ शेअर प्रकरणी २० गुन्हे दाखल झाले आहेत. टिष्ट्वटरद्वारे आक्षेपार्ह टिष्ट्वट केल्या प्रकरणी ८ गुन्हे दाखल झाले आहेत.

इस्टाग्रामवरून चुकीच्या पोस्ट टाकल्या प्रकरणी ४ गुन्हे दाखल झाले आहेत. तर अन्य सोशल मीडियाचा (आॅडिओ क्लिप्स, यूट्युब) गैरवापर केल्या प्रकरणी ४७ गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामध्ये आतापर्यंत २२३ आरोपींना अटक केली आहे. तर यापैकी १०२ आक्षेपार्ह पोस्ट्स काढण्यात यश आले आहे.

या कारवाया सुरू असतानाच आॅनलाइन भामट्यांचे नवनवीन प्रताप समोर येत आहेत. नागरिकांचा वाढता इंटरनेट वापर, त्यात पोर्नोग्राफी साइटचे सर्चिंग लक्षात घेता, त्यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात केली आहे. आरोपींकडून येणाºया संदेश अथवा ईमेलमध्ये ‘आम्हाला माहिती आहे की, तुम्ही कोणते संकेतस्थळ बघत होतात व आम्ही ते प्रदर्शित करू शकतो. आणि तसे नको असल्यास एका विशिष्ट अकाउंटमध्ये काही रक्कम भरा,’ अशा आशयाचा मजकूर असतो. त्यात अनेक जण बदनामीच्या भीतीने पैसेही भरत आहेत.

त्यामुळे महाराष्ट्र सायबर सर्व नागरिकांना आवाहन करत आहे की, आपण चुकून किंवा कुठल्याही प्रकारे अशा पोर्नोग्राफिक संकेतस्थळावर क्लिक करू नका. ही संकेतस्थळ सुरक्षित नसून कधीतरी तुमच्या नकळत अशा संकेतस्थळांवरून मेलद्वारे, अथवा व्हायरस डाउनलोड होऊ शकतो.

जो तुमच्या इंटरनेटवरील गतिविधी व तुमच्या संगणकातील माहिती जमा करून सायबर भामट्यांना पाठवतो आणि मग असे मेसेज येतात. जर कोणत्याही व्यक्तीस वरील नमूद मजकूर असणाºया आशयाचे संदेश आले तर घाबरून न जाता, आपल्या जवळच्या पोलीस ठाण्यात तक्रार द्या, असे आवाहन सायबर महाराष्ट्रने केले आहे. तर दुसरीकडे आपल्याकडे चाईल्ड पोर्नोग्राफी शोधणे गुन्हा असल्याचेही नमूद केले आहे. नागरिकांचा वाढता इंटरनेट वापर, त्यात पोर्नोग्राफी साइटचे सर्चिंग लक्षात घेता, त्यांनाच टार्गेट करण्यास सुरुवात
च्लॉकडाउनच्या काळात सायबर भामटे, गुन्हेगार व समाजकंटक या परिस्थितीचा गैरफायदा घेत आहेत.

Web Title: Clicking on ‘porn’ would be dangerous; Cyber police appeal

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.