Join us  

स्वच्छतेवर भर देणारी ‘आशीर्वाद’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 2:09 AM

अंधेरी पूर्वेकडील चांदिवली येथील आशीर्वाद सहकारी सोसायटीची स्थापना १९९६ साली झाली.

सागर नेवरेकर ।मुंबई : अंधेरी पूर्वेकडील चांदिवली येथील आशीर्वाद सहकारी सोसायटीची स्थापना १९९६ साली झाली. सोसायटीमध्ये ९६ कुटुंबे वास्तव्याला आहेत. इमारतीच्या परिसरात १६ सीसीटीव्ही कॅमेरे तैनात आहेत. इमारतीमध्ये पार्किंगची व्यवस्था उत्तम असून, दुचाकी वाहनांसाठी चांगली सोय आहे; परंतु चारचाकी वाहनांसाठी २० जागा मर्यादित असून, त्या फक्त मालकांसाठी राखीव आहेत. इमारतीमध्ये तीन सुरक्षारक्षक आणि दोन सफाई कामगार अविरतपणे कार्यरत असतात. सोसायटीच्या परिसरात बसण्याची उत्तम सोय आहे. १५ ते २० लोक आसनावर बसू शकतात. लिफ्टची सुविधा आणि इमारतीचा विमा काढलेला आहे.लहान मुलांसाठी खेळण्यासाठी सोसायटीच्या आवारात मैदान आहे. तसेच ज्येष्ठ नागरिकांसाठी नाना-नानी पार्क आहे. जॉगिंग ट्रॅक, खेळाचे मैदान, जिमखाना आणि अभ्यासिका अशी सुख-सुविधांनी परिपूर्ण सोसायटी आहे. वर्षभरात दोन वेळा लहान मुलांसाठी खेळाच्या विविध स्पर्धा आणि सामाजिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविले जातात. इयत्ता दहावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी गुणगौरव आणि मार्गदर्शन शिबिराचे आयोजन केले जाते. १५ आॅगस्ट आणि २६ जानेवारीला सांस्कृतिक कार्यक्रम घेतले जातात. महिलांसाठी स्पर्धा, हळदी कुंकू समारंभ, रांगोळी स्पर्धा, सांस्कृतिक कार्यक्रम, एकांकिका स्पर्धा आणि नृत्य स्पर्धा कार्यक्रम राबविले जातात. तसेच महिलांच्या क्रिकेट स्पर्धा भरवल्या जातात. नवरात्रोत्सवात खास महिलांसाठी गरबामध्ये वेशभूषा स्पर्धेचे आयोजन केले जाते. ज्येष्ठ नागरिकांसाठी कट्टा, ७० वर्षांवरील गृहस्थांचा २६ जानेवारीला सन्मान सत्कार केला जातो. तसेच आरोग्य आणि रक्तदान शिबिराचेही आयोजन केले जाते.सोसायटीमध्ये सुरक्षेच्या दृष्टीने बाहेरील फेरीवाल्यांना सक्त मनाई केलेली आहे. तसेच घरकामाला येणाºया महिलांसाठी फोटोपास आणि ओळखपत्र बनवले जाते. राष्ट्रीय सण, होळी, दसरा, वटपौर्णिमा, नाताळ व गुढीपाडवा असे सर्व धर्मांचे सण साजरे केले जातात. सोसायटीत होळी सण पर्यावरणपूरक पद्धतीने साजरा केला जातो. तसेच पाण्याचा अपव्यय प्रकर्षाने टाळला जातो. पाण्यासाठी सोसायटीमध्ये जनजागृती केली जाते. पाण्याच्या गळतीचे प्रकार थांबविले जातात. इमारतीच्या आवारात पाणी साचू दिले जात नाही. शिवाय, सोसायटीमध्ये नियमित पेस्ट कंट्रोल केले जाते. रोगराईमुक्त सोसायटी म्हणूनही सोसायटीची ओळख आहे.ओला आणि सुका कचरा असे कचºयांचे विभाजन करून कचºयांची विल्हेवाट लावली जाते. इमारतीच्या परिसरात २० ते २५ झाडे आहेत. त्यात प्रामुख्याने दोन नारळाची झाडे, १२ अशोकाची झाडे, आंबा, कडुलिंब आणि बदाम इत्यादी झाडे आहेत. सुशोभित रंगीबेरंगी फुलांची झाडेदेखील आहेत. सोसायटीत सर्वधर्मीय लोक राहत असून, प्रत्येक धर्मातील सणाच्या शुभेच्छा नोटीस बोर्डामार्फत दिल्या जातात. व्हॉट्स अ‍ॅप ग्रुप आणि आठवड्याची बैठक घेऊन एकमेकांशी संवाद साधला जातो. सोसायटीचा कारभार पूर्णपणे पारदर्शक आहे. सोसायटीचा वार्षिक अहवाल पुस्तकाच्या स्वरूपात सभासदांना दिला जातो. तंटामुक्ती समिती स्थापन करण्यात आली असून, सोसायटीतील भांडणे सामोपचाराने सोडवली जातात.>पर्यावरणपूरक उपक्रम‘आॅटो मशिन’ (स्वयंचलित पाण्याची यंत्रणा) बसवलेली आहे. यंत्रणेमुळे पाण्याची आणि विजेची बचत होते. सुरक्षेच्या दृष्टीने लाभदायक यंत्रणा आहे. त्यामुळे पर्यावरणाचा समतोल राखला जातो.म्हाडाच्या वसाहतीमध्ये अशा प्रकारचे नूतनीकरण, कुठेही दिसणार नाही. याला आशीर्वाद सोसायटी अपवाद आहे. सोसायटी सोलार प्रकल्पावर लवकरच काम सुरू करणार आहे.>गणेशोत्सवात ‘स्वच्छ सोसायटी, सुंदर सोसायटी’ ही स्पर्धा भरविण्यात येते. या स्पर्धेमध्ये आकर्षक बक्षिसे दिली जातात. रमेश प्रभू अध्यक्ष असलेल्या ‘महाराष्ट्र सोसायटी वेल्फेअर असोसिएशन’चे सदस्यत्व आशीर्वाद सहकारी सोसायटी (म्हाडा कॉलनी)कडे आहे.>स्वातंत्र्य दिन धूमधडाक्यातस्वातंत्र्य दिनानिमित्त सोसायटीच्या प्रांगणात ध्वजारोहणाचा कार्यक्रम आयोजित केला गेला. सकाळी ९च्या सुमारास ध्वजारोहण करण्यात आले. त्यानंतर शैक्षणिक वर्षात दहावी ते बारावी उत्तीर्ण झालेल्या मुला-मुलींचा गुणगौरव ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते करण्यात आला.>सहभागासाठी आवाहनलोकमत वृत्तपत्र समूहाच्या ‘आमची सोसायटी, आमचं कुटुंब’ या उपक्रमात आपल्या गृहनिर्माण संस्थेला सहभागी व्हायचे असल्यास आपण lokmat.mahasewa@gmail.com  या ई-मेल आयडीवर किंवा ९९३०५२९७७९ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधू शकता.