Join us

कोरोना अजून गेलेला नसल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 14, 2021 04:06 IST

डॉ. दीपक सावंत, कोरोना सद्यस्थितीवर केले भाष्यमनोहर कुंभेजकरलोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोना संपला आहे, असे ...

डॉ. दीपक सावंत, कोरोना सद्यस्थितीवर केले भाष्य

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : राज्यातील कोरोना संपला आहे, असे वाटत असताना पुन्हा एकदा नव्या रुग्णांची भर पडत आहे. मुंबईत १०० टक्के रेल्वे सेवा सुरू करा यासाठी आग्रह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. १ फेब्रुवारीपासून रेल्वे सेवा ठरावीक वेळेत प्रवाशांसाठी सुरू केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचित वाढ होत असल्याचे चित्र आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या त्रिसूत्रीप्रमाणे सर्वांनी मास्क लावणे, सोशल डिस्टन्सिंग पाळणे, हात सतत साबणाने धुणे याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.

मुंबई विमानतळावर गर्दी पाहण्याचा योग आला असता, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझेशनचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले.

नागरिक समजून घेत नाहीत आणि या सर्वाचे खापर महापालिका, राज्य शासनावर फोडले जाते हे दुर्दैवी असल्याची खंत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ. दीपक सावंत यांनी ‘लोकमत’कडे व्यक्त केली.