Join us  

कोरोना अजून गेलेला नसल्याने नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2021 5:07 PM

डॉ.दीपक सावंत यांनी कोरोना सद्य स्थितीवर केले भाष्य

मनोहर कुंभेजकर

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : राज्यातील कोरोना संपला आहे संपला आहे असे वाटत असतांना पुन्हा एकदा नव्या रुग्णांची भर पडत आहे. मुंबईत 100 टक्के रेल्वे सेवा सुरू करा यासाठी आग्रह मोठ्या प्रमाणात सुरू आहे. दि,1 फेब्रुवारी पासून रेल्वे सेवा ठराविक वेळेत प्रवाश्यांसाठी सुरू केल्याने कोरोना रुग्णांच्या संख्येत किंचीत वाढ होत असल्याचे चित्र आहे.त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलेल्या त्रिसूत्री प्रमाणे सर्वांनी मास्क लावणे,सोशल डिस्टनसिंग पाळणे,हात सतत साबणाने धुणे याकडे दुर्लक्ष करून चलणार नाही.

मुंबई विमानतळावर गर्दी पाहण्याचा योग आला असता, सोशल डिस्टनसिंग,सॅनिटायझेशनचा फज्जा उडाल्याचे चित्र दिसले.

नागरिक समजून घेत नाही,आणि यासर्वांचे खापर पालिका,राज्य शासनावर फोडले जाते हे दुर्दैवी असल्याची खंत राज्याचे माजी आरोग्य मंत्री डॉ.दीपक सावंत यांनी लोकमतकडे व्यक्त केली.

विमानतळाच्या अधिकाऱ्यांनी नुसती नागरिकांना घोषणा करून चालणर नाही.तर विमान प्रवाश्यांनी सीआरफीएफ टेस्ट करण्याच्या सूचना त्यांनी करणे गरजेचे असल्याचे मत डॉ.सावंत यांनी व्यक्त केले.

भाजी मंडई,मॉल्स या गर्दीच्या ठिकाणी मास्क सक्तीचे करणे गरजेचे आहे तसेच रेल्वे प्लॅटफॉर्म व बसस्थानक येथेही नव्याने नियमावली करणे गरजेचे आहे.याकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे लक्ष वेधणार असल्याचे डॉ.दीपक सावंत यांनी सांगितले.

तसेच सदर कोरोना व्हायरस  न्यूटेशन खूप जलद होत असल्याने महाराष्ट्रात व मुंबईत येणाऱ्या विविध नागरिकांच्या लक्षणांवर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. काँट्रॅक्ट ट्रेसिंग व पेशंट ट्रेसिंगचे निर्बंध थोड्या प्रमाणात कमी झाल्याने थोडे अवघड झाल्याचे त्यांनी सांगितले.

अनेक सामाजिक उपक्रम,सांस्कृतिक कार्यक्रम,राजकीय चळवळी,लग्न समारंभ,इतर सांस्कृतिक कार्यक्रम यातून जर नवीन व्हेंरियंटचा प्रसार होऊ शकतो अशी माहिती त्यांनी दिली.

लसीकरणाच्या दुसऱ्या टप्याची पुन्हा लस घेण्याविषयी स्पष्टता दिसत नाही.पहिल्या दिवशी लस घेतलेल्यांचा 28 दिवसांचा कालावधी पूर्ण झाला असतांना त्याबाबत स्पष्टता नसल्याने गोंधळाचे वातावरण आहे.लोकल आणि पब्लिक ट्रान्सपोर्ट यांच्या निर्जंतुकीकरणासाठी विशेष मोहिम व प्रयत्न करणे सातत्याने आवश्यक असल्याचे मत डॉ.सावंत यांनी शेवटी स्पष्ट केले.

टॅग्स :कोरोना वायरस बातम्या