Join us

वृक्षतोडीला नागरिकांचा तीव्र विरोध

By admin | Updated: May 29, 2017 07:10 IST

कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामासाठी दक्षिण आणि मध्य मुंबईत वृक्षतोड सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील आंदोलनकर्त्यांनी

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ च्या कामासाठी दक्षिण आणि मध्य मुंबईत वृक्षतोड सुरू असतानाच दक्षिण मुंबईतील आंदोलनकर्त्यांनी या वृक्षतोडीला आपला विरोध कायम ठेवला आहे. महत्त्वाचे म्हणजे वरळी येथेही मेट्रोच्या कामासाठी वृक्षतोड सुरू झाली असून, विधानभवन आणि चर्चगेट परिसरात ऐन रात्री करण्यात येत असलेले मेट्रोचे काम आता रहिवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे. महत्त्वाचे म्हणजे रविवारीही दक्षिण मुंबईत मेट्रोचे काम सुरू असलेल्या ठिकाणी नागरिकांनी वृक्षतोडीबाबत नाराजी व्यक्त केली आहे. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनकडून कुलाबा-वांद्रे-सीप्झ या भुयारी मेट्रो-३ चे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र या कामादरम्यान तब्बल पाच हजार वृक्ष तोडले जाणार असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे. महत्त्वाचे म्हणजे वृक्षतोडीप्रकरणी मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनला मुंबई उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालयाने दिलासा दिला आहे. परंतु असे असले तरी मेट्रोच्या कामादरम्यान होत असलेल्या वृक्षतोडीमुळे दक्षिण नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे.मेट्रो-३ प्रकल्प मार्च २०२१ मध्ये कार्यान्वित होईल.१४ लाख प्रवासी प्रवास करतील.२६ स्थानके भूमिगत आहेत.मेट्रो मार्गाची लांबी ३३.५ किलोमीटर आहे.शैक्षणिक संस्था, व्यावसायिक केंद्रे, मनोरंजनाची स्थळे, रुग्णालये आणि विमानतळासह महत्त्वाच्या वाहतूक केंद्रांना हा मार्ग जोडणार आहे.स्थानकांच्या आणि उर्वरित बांधकामांसाठी वृक्षतोड करावी लागत असून, यासाठीच्या कायदेशीर बाबींची पूर्तता करण्यात आली आहे.१ हजार ७४ झाडे तोडावी लागणार आहेत.कॉर्पोरेशनद्वारे १ हजार ७२७ वृक्षांचे पुनर्रोपण करण्यात येणार आहे.नवीन ३ हजार २२२ वृक्षांचे रोपण करण्यात येत आहे.मेट्रो-३ च्या स्थानकाचे काम पूर्ण झाल्यावर त्याच ठिकाणी झाडे पुनर्स्थापित केली जाणार आहेत. पुढील तीन वर्षे या झाडांची देखभाल कॉर्पोरेशनकडून केली जाणार आहे.मेट्रो-३ हा प्रकल्प मुंबईच्या उज्ज्वल भविष्यासाठी गरजेचा असून, याद्वारे शहराच्या वाहतूक व्यवस्थेत कायमस्वरूपी सुधारणा घडवून आणली जाणार आहे, असा दावा कॉर्पोरेशनने केला आहे.कार्बन उत्सर्जनात प्रतिवर्षी सुमारे १० हजार मेट्रिक टनने घट होईल. त्यामुळे पर्यावरण संवर्धनास हातभार लागेल.मेट्रो-३ प्रकल्पासाठी वृक्षतोडीस बंदी नाही, ही बाब तसेच प्रकल्पाचे महत्त्व विचारात घेऊन प्रकल्पाच्या कामासाठी सहकार्य करावे, असे आवाहन कॉर्पोरेशनने केले आहे.येत्या दोन ते तीन दिवसांत आम्ही आमच्या आंदोलनाची भूमिका निश्चित करू. रविवारी झालेल्या बैठकीत मेट्रो ३ वरून निर्माण झालेल्या सर्व समस्यांवर चर्चा करण्यात आली. आता नेमके काय करायचे हे आम्ही ठरवू.- मनी गोपाल कृष्णन, स्थानिक रहिवासीमेट्रो प्राधिकरणाने मेट्रोचे काम रात्री करता कामा नये आणि झाडांच्या बाबतीत बोलायचे झाल्यास पर्यावरणाची हानी होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. जेवढी झाडे तोडली जातील त्याच्या मोबदल्यात अधिकाधिक झाडे लावली पाहिजे. जागतिक पर्यावरण दिनासह पर्यावरणाचे भान राखत काम करण्यात यावे.- गॉडफ्रे पिमेंटा, विश्वस्त, वॉचडॉगदक्षिण मुंबईतील चर्चगेट आणि विधानभवन परिसरात रात्री करण्यात येत असलेल्या मेट्रोच्या कामाचा रहिवाशांना त्रास होत आहे. शनिवारी रात्री वरळी येथील वृक्ष तोडण्यात आले असून, याबाबत नागरिकांमध्ये कशी जनजागृती करता येईल, याचा आम्ही प्रामुख्याने विचार करत आहोत.- अश्विन नागपाल, रहिवासी, दक्षिण मुंबईमेट्रोच्या कामासाठी अद्यापही मातीची तपासणी करण्यात आलेली नाही. खोदकाम पूर्ण झाले नसताना प्रशासनाला वृक्ष तोडण्याची एवढी घाई का आहे. महत्त्वाचे म्हणजे वृक्ष लागवडीपेक्षा वृक्षतोडीवर सरकार जास्त खर्च करत आहे. दरम्यान, न्यायालयाने वृक्षतोडीला परवानगी दिली असेल तर हे काम थांबविता येणार नाही. आणि दुसरे असे की, हे काम दिवसा केले तर नागरिक याला विरोध करतील. म्हणून हे काम रात्री केले जात आहे.- डी. स्टॅलिन, प्रकल्प संचालक, वनशक्ती