Join us  

मुंबई विमानतळावर अडीच कोटींच्या सिगारेट जप्त; डीआरआयची कारवाई

By मनोज गडनीस | Published: January 01, 2024 6:23 PM

मुंबई विमानतळावरील कार्गो विभागात ही कारवाई करण्यात आली आहे.

मुंबई - दुबईतून आपल्या बेडशीट आणि लेडीज ड्रेस मटेरियल येत असल्याचे कागदोपत्री सांगत त्याच्या माध्यमातून परदेशी सिगरटेची तस्करी करणाऱ्या एका कस्टम क्लिअरिंग एजंटला केंद्रीय महसूल गुप्तचर यंत्रणेच्या (डीआरआय) अधिकाऱ्यांनी अटक केली आहे. काळूराम कोकणे असे या क्लिअरिंग एजंटचे नाव आहे.

मुंबई विमानतळावरील कार्गो विभागात ही कारवाई करण्यात आली आहे. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबईतून मुंबई विमातळावरी कार्गो विभागात दाखल झालेल्या एका मालाच्या माध्यमातून सिगारेटची तस्करी होत असल्याची विशिष्ट माहिती अधिकाऱ्यांना मिळाली होती. त्यानुसार कार्गो विभागातील सामानाची अधिकाऱ्यांनी तपासणी केली. त्या दरम्यान बेड शीट आणि लेडिज ड्रेस मटेरियलची नोंद असलेल्या सामानाची जेव्हा तपासणी केली तेव्हा त्यामध्ये या सिगरेट आढळून आल्या. त्या मालामध्ये एकूण १६ लाख परदेशी सिगारेट होत्या व त्याची आंतरराष्ट्रीय बाजारातील किंमत २ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे.

टॅग्स :मुंबईसिगारेट