Join us  

‘बायोफोकल’साठी तीन हजार विद्यार्थ्यांना पसंतीचे महाविद्यालय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 22, 2018 6:06 AM

अकरावी प्रवेशातील बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत.

मुंबई : अकरावी प्रवेशातील बायफोकल (द्विलक्षी) अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातून १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. या प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी गुरुवारी जाहीर झाली असून, पहिल्या यादीत ७४०६ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले आहेत. पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ३ हजार ३७१ इतकी आहे.अकरावी प्रवेशातील द्विलक्षी (बायफोकल) विषयाच्या अभ्यासक्रमासाठी मुंबई विभागातील महाविद्यालयात असणाºया २६ हजार ९०४ जागांसाठी केवळ १४ हजार ३३८ विद्यार्थ्यांनी अर्ज दाखल केल होते. या विद्यार्थ्यांची पहिली यादी गुरुवारी सकाळी जाहीर झाली. यामध्ये शाखानिहाय बायफोकल विद्यार्थ्यांच्यापैकी कला शाखेतील विषयांसाठी ११ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी ११ विद्यार्थ्यांना प्रवेश मिळाले. तर वाणिज्य शाखेतील ४४५ विद्यार्थ्यांनी अर्ज केले होते. त्यापैकी या यादीत २५६ विद्यार्थ्यांना तर विज्ञान शाखेतील १३ हजार ८८२ विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. त्यापैकी ७ हजार १३९ जणांना प्रवेश मिळाले आहेत.३३७१ विद्यार्थ्यांना पहिल्या पसंतीचे महाविद्यालय मिळाले आहेत. प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना २१ ते २२ जूनपर्यंत महाविद्यालयात जाऊन प्रवेश घ्यायचे आहेत. त्यानंतर २८ जून रोजी दुसरी गुणवत्ता यादी जाहीर होईल. पहिल्या फेरीच्या प्रवेशाच्या काळात बायफोकल विषय वगळता अन्य पारंपरिक शाखांत प्रवेश घेण्यासाठी २५ जूनपर्यंत मुदत आहे.