Join us

चिपळूण तालुका नुकसानभरपाई रखडली

By admin | Updated: August 14, 2014 22:39 IST

: वादळी पावसाचा सर्वाधिक फटका

चिपळूण : तालुक्यात मे महिन्यात झालेल्या वादळी पावसाचा फटका शहरासह ग्रामीण भागातील ग्रामस्थांना बसला. यामध्ये अनेक घरांची पडझड झाल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. याबाबतचा पंचनामा तहसील कार्यालयाकडून करण्यात आला आहे. मात्र, अद्याप नुकसानग्रस्तांना भरपाई देण्यास अधिकाऱ्यांकडून टोलवाटोलवी केली जात असल्याचा आरोप पेढे शिवसेना शाखेचे सचिव प्रवीण पाकळे यांनी केला आहे.दि. ७ मे रोजी चिपळूण तालुक्यात झालेल्या वादळी पावसाने अनेक घरांचे व बागायतदारांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. तालुक्यात विविध ठिकाणी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे नुकसानीचा आकडा वाढला आहे. पेढे गावाला याचा सर्वाधिक फटका बसला आहे. २० ग्रामस्थांची घरे व जनावरांचा दवाखाना आदींची पडझड झाली. कृषी व तहसील कार्यालयाकडून याबाबतचा पंचनामा झाला असून, तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी नुकसानग्रस्तांना भरपाई मिळालेली नाही.याबाबत प्रांताधिकारी व तहसीलदार वृषाली पाटील यांच्याकडे पत्रव्यवहार करण्यात आला असून, तलाठी कार्यालय, संबंधित ग्रामपांचयत, कृषी सहाय्यक यांच्याशी नुकसानग्रस्थांनी चौकशी केल्यानंतर नुकसानभरपाई लवकरच मिळेल, असे उत्तर देऊन त्यांची बोळवण केली जात आहे, असे पाकळे यांनी यावेळी सांगितले.लवकरच शासनाकडून मदत मिळेल व आपल्या आपल्या घराची दुरुस्ती करुन घेता येईल, या आशेवर आहेत. काहींनी कर्ज काढून घरांची दुरुस्ती सुरू केली आहे. अनेकांच्या बागाही उद्ध्वस्त झाल्या आहेत. त्यांच्यासमोर गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे ही भरपाई कधी मिळणार? असा प्रश्न निर्माण झाला आहे. अवेळी झालेल्या वादळी पावसात नुकसान झालेल्या ग्रामस्थांना लवकरच शासकीय मदत दिली जाईल, असे आश्वासन आमदार, खासदार देत आहेत. ही मदत केव्हा मिळणार हे अद्याप गुलदस्त्यात आहे. नुकसानीचे पंचनामे तयार झाले असून, नुकसानग्रस्तांना मदत वाटप करणयाबाबतची मागणी कार्यालयाकडे करण्यात आली आहे. अनुदानप्राप्त होताच नुकसान झालेल्या लाभार्थींना अनुदान वाटपाची कार्यवाही केली जाईल, असे तहसिलदार वृषाली पाटील यांनी पत्राद्वारे कळवले आहे. (वार्ताहर)अधिकाऱ्यांची टोलवाटोलवीतहसील कार्यालयाकडून पंचनामा, भरपाई मात्र रखडलेलीच.भरपाई देण्यास टोलवाटोलवी केली जात असल्याचा शिवसेनेचा आरोप.अनेक घरांची पडझड; लाखो रुपयांचे नुकसान.तीन महिन्यांचा कालावधी उलटून गेला तरी भरपाई नाही.अनुदान प्राप्त होताच मदत करणार : पाटीलशासनाकडून आपत्तीच्या होणाऱ्या नुकसानीची भरपाई वेळेत मिळत नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. प्रतिवर्षी अवेळी ही भरपाई येते आणि त्यामुळे ती नुकसानग्रस्तांपर्यंत पोहोचण्यातही अडचणी उभ्या राहतात. त्यानंतर ती परत जाते. मग अशा भरपाईचा उपयोग काय? असा सवाल नुकसानग्रस्तांकडून करण्यात येत आहे.