Join us  

सात हजार झोपडीवासीयांच्या पुनर्वसनाचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 24, 2017 2:05 AM

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना राबविण्याचे सूतोवाच केले असतानाच दक्षिण मुंबईतील तब्बल ७० गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे.

मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी २०१९पर्यंत ‘सर्वांसाठी घरे’ ही संकल्पना राबविण्याचे सूतोवाच केले असतानाच दक्षिण मुंबईतील तब्बल ७० गृहनिर्माण संस्थांनी एकत्र येऊन झोपडपट्टी पुनर्वसन योजना राबविण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सुमारे सात हजार झोपडीवासीयांनी या प्रकल्पास सहमती दर्शविली असून, याबाबतचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठविला आहे.दक्षिण मुंबईत कफ परेड येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्री गणेशमूर्तीनगर कफ परेड बॅकबे रेक्लमेशन एसआरए ६५८/५९९ गृहनिर्माण संस्था (नियोजित) या संस्थेची स्थापना नुकतीच करण्यात आली. एसआरए अंतर्गत या वसाहतीचा पुनर्विकास होणार असून, या पुनर्विकासांतर्गत तब्बल सात हजार झोपडीवासीयांना आपले हक्काचे घर मिळणार आहे. दक्षिण मुंबईतील कफ परेड येथे क्र. सी ६५८/५९९ हा ३२ एकर भूखंडावर त्यांचे पुनर्वसन प्रस्तावित आहे. याबाबत नुकतीच या प्रकल्पाचे सल्लागार विनायक वेंगुर्लेकर यांच्या उपस्थितीत येथील रहिवाशांची बैठक पार पडली. त्यात मागील विकासकांसोबत विविध गृहनिर्माण संस्थांनी पुनर्वसन करण्याबाबत केलेला करार सवार्नुमते रद्द करून निष्कासित करण्यात आला. तसेच यापुढे केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि श्री गणेशमूर्तीनगर कफ परेड बॅकबे रेक्लमेशन एसआरए ६५८/५९९ गृहनिर्माण संस्था (नियोजित) या एकाच संस्थेअंतर्गत पुनर्विकास करण्यास येथील झोपडीवासीयांनी लेखी संमती दिली. झोपडपट्टीवासीयांनी दिलेल्या या संमतीमुळे येथील पात्र व अपात्र झोपडीधारकांचा प्रश्न मार्गी लागणार आहे. विविध झोपडीवासीयांनी एकत्र येऊन स्थापन केलेल्या या एकमेव गृहनिर्माण संस्थेने झोपडीवासीयांचे पुनर्वसन करण्याबाबचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांना पाठविला असल्याची माहिती वेंगुर्लेकर यांनी दिली.

टॅग्स :मुंबईदेवेंद्र फडणवीस