Join us  

रसायन उद्योगाचा पसारा दुपटीने वाढणार - गौडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2019 5:04 AM

भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलीयनपर्यंत नेण्यासाठी रसायने आणि खत उद्योग मोठी भूमिका बजावू शकतो.

मुंबई : भारतीय अर्थव्यवस्थेला पाच ट्रिलीयनपर्यंत नेण्यासाठी रसायने आणि खत उद्योग मोठी भूमिका बजावू शकतो. पाच वर्षात हा उद्योग दुप्पटीने वाढणार असल्याचा विश्वास खते आणि रसायन मंत्री सदानंद गौडा यांनी व्यक्त केला. याबाबतच्या जागतिक परिषदेच्या उद्घाटनप्रसंगी गौडा बोलत होते.उत्पादन उद्योगात केमिकल आणि पेट्रोकेमिकलचा वाटा सध्या ७.७६ टक्के आहे. पुढील पाच वर्षात हाच वाटा २० ते २५ टक्केपर्यंत पोहचण्याची क्षमता आहे. पूर्ण क्षमतेने या उद्योगाचा विस्तार व्हावा यासाठी केंद्र सरकार योग्य धोरणांची अंमलबजावणी तसेच आवश्यक बदल करण्यात तयार असल्याचेही गौडा यांनी सांगितले. या उद्योगातील गुंतवणूक वाढीसाठीच्या अभ्यास केंद्राचेही यावेळी उद्घाटन करण्यात आले.