मुंबई : टीआरपी घोटाळ्याप्रकरणी मुंबई पोलिसांनी न्यायदंडाधिकारी न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. या प्रकरणाचा तपास करत असलेल्या मुंबई पोलिसांच्या क्राईम इंटेलिजन्स युनिटने (सीआयू) हे दोषारोपपत्र दाखल केले आहे.
क्राईम ब्रँचने आतापर्यंत या प्रकरणी १२ जणांना अटक केली. टीआरपी घोटाळ्याप्रकरणी रेटिंग एजन्सी ब्रॉडकस्ट ऑडियन्स रिसर्च कौन्सिल (बार्क)ने हंसा रिसर्च ग्रुपद्वारे पोलिसांकडे गुन्हा नोंदविल्यावर हे प्रकरण उघडकीस आले. रिपब्लिक टीव्हीसह फक्त मराठी आणि बॉक्स सिनेमा यांचाही यात समावेश आहे. काही दिवसांपूर्वीच ईडीनेही याप्रकरणी ईसीआर नोंदविला आहे. मुंबई पोलिसांनी नोंदविलेल्या गुन्ह्याची दखल घेत ईडीनेही या प्रकरणी गुन्हा नोंदविला.
वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!
Web Title: Chargesheet filed in TRP scam
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.