Join us

व-हाडी बनून ठोकल्या आरोपीला बेड्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 27, 2018 06:26 IST

अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेला आरोपी पॅरोलवरून पसार झाला. तो

मुंबई : अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात शिक्षा सुनावलेला आरोपी पॅरोलवरून पसार झाला. तो लग्नाच्या वरातीत नाचत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. लग्न सोहळ्यात कारवाई कशी करणार? म्हणून आरे पोलिसांनी वºहाडी बनून लग्नाच्या वरातीत सहभाग घेतला आणि नाचण्यात गुंग असलेल्या मनोजकुमार सत्यनारायण पासवान उर्फ गब्बरला सापळा रचून बेड्या ठोकल्या.अपहरण आणि बलात्काराच्या गुन्ह्यात २०१२ मध्ये गब्बरला आरे पोलिसांनी अटक केली. न्यायालयात शिक्षा भोगत असताना पॅरोलवर असताना तो फरार झाला. स्थानिक पोलिसांनी त्याचा शोध सुरू केला. दरम्यान, सोमवारी रात्री साडेदहाच्या सुमारास तो नातेवाइकाच्या लग्नाच्या वरातीत नाचत असल्याची माहिती आरे पोलिसांना मिळाली. त्यानुसार आरे पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षक व्ही. हिरेमठ यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाने घटनास्थळी धाव घेतली.वरातीत कारवाईमुळे गोंधळ होऊ नये यासाठी पोलीस वरातीत वºहाडी बनून सहभागी झाले. यासाठी त्यांनी स्थानिक पोलिसांचीही मदत घेतली. नाचत नाचत गब्बरभोवती सापळा रचून त्याला तेथून बाहेर काढले. ते वºहाडी नसून पोलीस असल्याचे समजताच गब्बरही गोंधळला. तो पळून जाण्याच्या आधीच पोलिसांनी त्याला अटक केली. या प्रकरणी अधिक तपास सुरू असल्याची माहिती आरे पोलिसांनी दिली.