Join us  

पदवीधर व शिक्षक निवडणूकांच्या तारखा बदला; महाराष्ट्र राज्य शिक्षक -शिक्षकेत्तर सेनेची राज्य निवडणूक आयुक्तांकडे मागणी

By मनोहर कुंभेजकर | Published: May 09, 2024 6:06 PM

राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूका सोमवार दिनांक १० जून रोजी घोषित केल्या.

मनोहर कुंभेजकर, मुंबई-एकीकडे मुंबईत लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सूर असतांना काल राज्य निवडणूक आयोगाने विधानपरिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूका सोमवार दिनांक १० जून रोजी घोषित केल्या.

या कालावधीत बहुतेक शिक्षक व पदवीधर शाळा व महाविद्यालयांना सुट्टी असल्याने आपल्या कुटुंबासह बाहेर गावी असतात.यंदा शाळा दि,15 जून पासून सुरू होणार असल्याने त्यांनी दि,12 व दि,13ची परतीच्या तिकिटांचे आरक्षण करून तिकीटे देखिल काढली आहेत. त्यामुळे निवडणुकीचा कार्यक्रम पुढे ढकलून मतदानाची तारिख जुलैच्या पहिल्या आठवड्यात घ्यावी अशी विनंती शिवसेना अंगिकृत महाराष्ट्र राज्य शिक्षक -शिक्षकेत्तर सेना राज्य समन्वयक शिवाजी शेंडगे यांनी आज पत्राद्वारे राज्य निवडणूक आयुक्तांकडे केली आहे.

त्यामुळे जर मतदाराच निवडणूकीला हजर नसल्यास मतदान देखिल कमी होते आणि त्याचा मतदान टक्केवारीवर  परिणाम होतो. सदर  दोन्ही निवडणूका या मुंबईत राहणाऱ्या शिक्षक व पदवीधरांच्या आहे. विधानपरिषदेच्या निवृत्त होणाऱ्या सदस्यांचा कालावधी हा दि,7 जुलै 2024 असल्याचे शेंडगे यांनी राज्य निवडणूक आयुक्तांच्या निदर्शनास आणले.

याबाबत माजी आरोग्य मंत्री व राज्य कूपोषण टास्क फोर्स निर्मूलन समितीचे अध्यक्ष (मंत्री दर्जा ) डॉ.दीपक सावंत यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सांगितले की,पदवीधर व शिक्षक मतदार संघाची निवडणूक ही सोमवार दि, १० जून रोजी घोषित झाल्याने दरवेळे प्रमाणे कामावर जायचे की मतदानाला जायचे हा प्रश्न  विचारला जातो आणि पर्यायाने मतदान कमी होते . त्यामुळे मतदान करणारे मतदानास इच्छुक नसल्याने मतदानाचा टक्का घसरतो.त्याच बरोबर लोकसभा निवडणूका व पदवीधर -शिक्षक मतदार संघाच्या निवडणूका या मध्ये फारसे अंतर नसल्याने पक्षाचे कार्यकर्ते  नाराजी व्यक्त  करताना दिसतात.त्यामुळे या दोन्ही निवडणुकांची तारिख बदलणे गरजेचे असल्याचे मत  डॉ.दीपक सावंत यांनी व्यक्त केले.

टॅग्स :निवडणूक