Join us  

जलवाहिनी झोपडपट्टीमुक्त करण्याचे आव्हान, चार दिवसांत अकरा हजार झोपड्यांचे लक्ष्य

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 2:19 AM

मुंबई : झोपड्यांनी वेढलेल्या तानसा जलवाहिनीला मुक्त करण्याची मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे.

मुंबई : झोपड्यांनी वेढलेल्या तानसा जलवाहिनीला मुक्त करण्याची मोहीम उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सुरू आहे. मात्र, यासाठी केवळ ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत असल्याने, चार दिवसांत तब्बल अकरा हजार झोपड्या हटविण्याचे आव्हान मुंबई महापालिकेपुढे आहे.मुख्य जलवाहिन्यांच्या सुरक्षेसाठी दहा मीटर परिसरातील झोपड्या हटविण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत. या कारवाईसाठी ३१ आॅक्टोबरपर्यंतची मुदत देण्यात आली आहे. जलवाहिन्यांच्या बाजूला सुमारे १६ हजार झोपड्या होत्या. यापैकी २०११ पासून पाच हजार झोपड्या हटविण्यात आल्या आहेत. म्हणजेच आणखी अकरा हजार झोपड्या येत्या चार दिवसांमध्ये हटविण्याचे लक्ष्य पालिकेसमोर आहे.न्यायालयाने ३१ तारखेची मुदत दिली आहे. मात्र, झोपड्या हटविण्यात अनेक अडचणींचा महापालिकेला सामना करावा लागतो. काही वेळा पोलीस संरक्षण नाही, तर अनेक वेळा रहिवाशांकडून विरोध केला जातो. त्यामुळे न्यायालयाकडे मुदतवाढ मागण्याचे पालिकेचे प्रयत्न सुरू आहेत.जलवाहिनीच्या बाजूच्या झोपड्याके (पूर्व) अंधेरी १४०८ (झोपड्यांचा सर्व्हे पूर्ण)एफ (उत्तर) वडाळा, सायन-२४०१ (रहिवासी कोर्टात)एच (पूर्व) बांद्रा १६३३(सर्व्हे पूर्ण)एल कुर्ला ५५०७ (३१५ झोपड्या हटविल्या)जी उत्तर ५०९