Join us  

मध्य रेल्वेची साडेतीन लाख फुकट्या प्रवाशांवर कारवाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 03, 2021 4:06 AM

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सखोल व नियमित तिकीट तपासणी केली. यामध्ये ...

मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून २०२० ते मार्च २०२१ पर्यंत सखोल व नियमित तिकीट तपासणी केली. यामध्ये विनातिकीट /अनियमित प्रवासाची ३.४३ लाख प्रकरणे शोधण्यात आली त्यामधून १२.२९ कोटी रुपये दंड वसूल केला आहे.

मध्य रेल्वेने अधिकृत प्रवाशांसाठी उत्तम सेवा पुरविण्याच्या प्रयत्नात तसेच विनातिकिट प्रवासाला आळा घालण्यासाठी नियमितपणे विनातिकीट आणि अनियमित प्रवाशांविरूद्ध तीव्र मोहीम राबविली आहे.

मध्य रेल्वेच्या मुंबई विभागाने जून २०२० ते मार्च २०२१ या कालावधीत उपनगरी आणि बाहेरगावच्या गाड्यांमध्ये सखोल व नियमित तिकीट तपासणी चालविली. या तपासणी दरम्यान, विनतिकीट/अनियमित प्रवाशांची ३,४३,८९८ प्रकरणे आढळून आली आणि १२,२९,८१,८८९ रुपयांचा दंड म्हणून वसूल करण्यात आले. यापैकी सुमारे २.४८ लाख प्रकरणे उपनगरी गाड्यांमध्ये आढळली ज्यात दंड म्हणून रु. ६.६३ कोटी आणि बाहेरगावच्या गाड्यांमधील ९५ हजार प्रकरणांतून ५.६२ कोटींचा दंड वसूल करण्यात आला. गैरसोय टाळण्यासाठी आणि सन्मानाने प्रवास करण्यासाठी प्रवाशांना योग्य आणि वैध रेल्वे तिकिटांसह प्रवास करण्याचे आवाहन मध्य रेल्वेने केले आहे.

टॅग्स :मुंबई उपनगरी रेल्वेमध्य रेल्वे