Join us  

मध्य रेल्वे मार्गावरील स्वच्छतेचे वाजले तीनतेरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2019 1:10 AM

मशीद ते भायखळा : रुळांवर घाणीचे साम्राज्य, प्रशासनाचे दुर्लक्ष, प्रवाशांना नाहक त्रास

मुंबई : मध्य रेल्वे मार्गावरील मशीद ते भायखळा या रेल्वे मार्गावर अस्वच्छता आहे. परिणामी, मार्गावरील ‘स्वच्छता मोहिमे’चे तीनतेरा वाजले आहेत.मध्य रेल्वे मार्गावर मागील अनेक दिवसांपासून स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे. मात्र मशीद ते भायखळा येथे कचरा, सांडपाणी यांची स्वच्छता प्रशासनाला करता आली नाही. येथून प्रवास करताना नाकाला रुमाल धरावा लागतो, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.मध्य रेल्वे मार्गावरील सीएसएमटी स्थानक ‘स्वच्छ स्थानक’ म्हणून घोषित केले आहे. मात्र या स्थानकापासून १ किमीच्या अंतरावरील स्थानकामध्ये अस्वच्छता आहे. या मार्गावर कचरा पोत्यांमध्ये टाकण्यात आला आहे. पोत्यांमधील कचरा उचलण्यात येत नसल्याने तो कचरा तिथेच सडून जातो. रेल्वे परिसराबाहेरील वस्तीमधील सांडपाणी रेल्वेच्या नाल्यात सोडले जाते. त्यामुळे रेल्वे परिसरात दुर्गंधीचे प्रमाण वाढले आहे, अशी प्रतिक्रिया प्रवाशांनी दिली.२०१४ सालापासून रेल्वेला वेगवेगळ्या मार्गाने येथील स्वच्छता करण्यासाठी सांगत आहे. रेल्वेमंत्री पीयूष गोयल, मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक, विभागीय व्यवस्थापक यांना सोशल मीडियावर टॅग करून अस्वच्छतेची माहिती देत आहे. मात्र कोणत्याही प्रकारची सकारात्मक पावले उचलली गेली नाही. लोकलमध्ये ‘कचरा करू नये, स्वच्छता ठेवण्यात यावी’ अशा उद्घोषणा केल्या पाहिजेत. यासह जे लोक रेल्वे परिसरात कचरा करतात, त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे.- धर्मेश बरई,संस्थापक, एन्व्हॉर्नमेन्ट लाइफ

टॅग्स :मध्य रेल्वे