Join us  

‘तत्काळ’ रांगेवर सीसीटीव्हींचा ‘वॉच’  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 06, 2018 6:19 AM

सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून जादा ट्रेन चालवल्या जातात. मात्र तरीदेखील तिकीट उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मध्य रेल्वेकडे सातत्याने येत होत्या. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता तत्काळ रांगेवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमातून आठवडाभरात १५ दलालांना पकडण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.

मुंबई - सुट्ट्यांनिमित्त होणारी गर्दी लक्षात घेता मध्य रेल्वेकडून जादा ट्रेन चालवल्या जातात. मात्र तरीदेखील तिकीट उपलब्ध नसल्याच्या तक्रारी मध्य रेल्वेकडे सातत्याने येत होत्या. तिकिटांचा काळाबाजार रोखण्यासाठी आता तत्काळ रांगेवर सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ठेवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. नुकत्याच सुरू झालेल्या या अभिनव उपक्रमातून आठवडाभरात १५ दलालांना पकडण्यात मध्य रेल्वे प्रशासनाला यश आले आहे.उन्हाळी सुट्टीनिमित्त मध्य रेल्वेने ४५०पेक्षा अधिक मेल-एक्स्प्रेसचे नियोजन केले आहे. याचबरोबर कोकण मार्गावर गर्दीचा काळ लक्षात घेता विशेष एक्स्प्रेसदेखील सुरू केल्या. लोकमान्य टिळक टर्मिनस येथून उत्तर भारतात जाणाऱ्या मेल-एक्स्प्रेसमध्ये दलालांचा सुळसुळाट असल्याच्या तक्रारी रेल्वेला प्राप्त झाल्या. याचबरोबर या ट्रेनच्या तत्काळ रांगेत सीसीटीव्हींच्या माध्यमातून नजर ठेवण्यात आली. रांगेत वारंवार दिसणाºया प्रवाशांची रेल्वे सुरक्षा दलांच्या जवानांनी ओळख पटवून त्यांच्याकडे चौकशी केली असता ते दलाल असल्याचे उघडकीस आले आहे. एकंदरीतच मध्य रेल्वेने सीसीटीव्हींच्या माध्यमातून तिकिटांचा काळाबाजार करणाºयांविरोधात अटकेची मोहीम सुरू केल्याने प्रवाशांना दलांलापासून दिलासा मिळाला आहे.मेल-एक्स्प्रेसच्या फलाटात बदललोकमान्य टिळक टर्मिनस आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस येथे होणाºया प्रवाशांना गर्दीमुक्त वातावरणात ट्रेनमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी मध्य रेल्वेने विशेष उपक्रम हाती घेतला आहे. एकाच फलाटाहून एकामागोमाग येणाºया मेल-एक्सप्रेसमुळे फलाटांवर गर्दी होते. प्रायोगिक तत्त्वावर १० मेल-एक्स्प्रेसच्या फलाटात बदल करण्यात आले. याची माहिती प्रवाशांना उद्घोषणा यंत्रणेतून देण्यात येते. यामुळे एकाच फलाटावरील संभाव्य गर्दी टाळण्यात यश आले आहे, अशी माहिती मध्य रेल्वेच्या अधिकाºयांनी दिली.

टॅग्स :सीसीटीव्हीभारतीय रेल्वे