Join us  

लोकलमध्ये सीसीटीव्ही, टॉकबॅक यंत्रणा : ‘देर आये पर दुरुस्त आये’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 1:52 AM

उपनगरीय लोकलमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, ‘देर आये दुरुस्त आये’ अशा स्वरूपात आहे.

मुंबई : उपनगरीय लोकलमध्ये महिला प्रवाशांची संख्या लक्षणीय आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षेच्या दृष्टीने लोकलमध्ये सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणा कार्यान्वित करण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने नुकताच घेतला आहे. रेल्वे प्रशासनाचा हा निर्णय म्हणजे, ‘देर आये दुरुस्त आये’ अशा स्वरूपात आहे. सीसीटीव्ही आणि टॉकबॅक यंत्रणेसह महिलांसाठीच्या राखीव बोगी वाढवण्याची मागणी महिला प्रवाशांकडून होत आहे.मध्य रेल्वेवर १५५ रेकच्या माध्यमाने तिन्ही मार्गांवर रोज एकूण १७०६ फेºया होतात. लोकलमधील महिला प्रवाशांच्या नियंत्रणासाठी महिला बोगीत टॉकबॅक यंत्रणादेखील कार्यान्वित होणार आहे. १५ बोगींच्या एका रेकमध्ये पाच महिला राखीव डबे आहेत. तर १२ बोगींच्या रेकमध्ये तीन महिला विशेष बोगी आहेत. विशेष म्हणजे, महिला प्रवाशांची संख्येत वाढ होऊनदेखील महिला प्रवाशांच्या बोगीत वाढ झालेली नाही. परिणामी, महिला प्रवाशांना आजदेखील गर्दीतूनच प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मध्य रेल्वेने २७६ कोटींचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाने मंजूर केला आहे.प्रस्तावानुसार सर्व रेकमध्ये सीसीटीव्ही बसविण्यात येणार आहे. महिला सुरक्षिततेसाठी महिला बोगीत टॉकबॅक यंत्रणादेखील कार्यान्वित करण्यात येणार असल्याची माहिती मध्य रेल्वेने दिली.टॉकबॅक यंत्रणा म्हणजे काय?आपत्कालीन परिस्थितीत लोकलच्या गार्ड आणि मोटरमनशी संपर्क साधण्याच्या यंत्रणेला ‘टॉकबॅक’ यंत्रणा असे म्हणतात. यामुळे कोणत्याही महिला प्रवाशाला तातडीने मदत मिळणे शक्य आहे. रेल्वे बोर्डाने प्रथम दर्जासह प्रथम आणि द्वितीय दर्जाच्या महिला बोगीत एकूण एक हजार १०६ टॉकबॅक यंत्रणा बसविण्याचा निर्णय घेतला आहे.महिलांची गर्दी पाहून ‘बिग बी’ थक्क-लोकल पकडण्यासाठी महिला प्रवाशांच्या गर्दीचा व्हिडीओ सध्या टिष्ट्वटरवर ‘रिटिष्ट्वट’ होत आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ पाहून बिग बी अमिताभ बच्चन यांनादेखील रिटिष्ट्वट करायला उद्युक्त केले आहे.‘गूडनेस...’ अशा एका शब्दांत त्यांनी भावना व्यक्त करत आश्चर्यकारक संबोधचिन्हाचा वापर केला आहे. विशेष म्हणजे, बिग बींच्या या ‘रिटिष्ट्वट’वर ४१२ नेटिझन्सने रिटिष्ट्वट केले असून, २३५ जणांनी भाष्य आणि २,७००पेक्षा जास्त जणांनी लाइक केले आहे.उद्योगपती हर्ष गोएंका यांनी १० सेकंदांचा व्हिडीओ टिष्ट्वट केला होता. यावर एक हजार ३४ जणांनी रिटिष्ट्वट केले आहे. यापैकी बहुतांशी जणांनी कोट रिटिष्ट्वट करत महिला प्रवाशांसाठी सुखद प्रवासाची मागणी केली आहे.रेल्वेने दिलेल्या आकडेवारीनुसार, मध्य आणि पश्चिम रेल्वेवर ७५ लाख प्रवासी प्रवास करतात. यापैकी सुमारे २२ टक्के महिला प्रवासी आहेत. मध्य रेल्वेवर अंदाजे दहा लाख, तर पश्चिम रेल्वेवर साधारणपणे आठ लाख महिला प्रवासी प्रवास करतात. १२ बोगींच्या एका लोकलमध्ये प्रथम दर्जाची ४५ आसने आणि द्वितीय दर्जाची २८८ आसने महिलांसाठी राखीव असल्याची माहिती समोर येते.

टॅग्स :मुंबई लोकल