Join us  

सीबीआयकडून साहाय्य मिळत नाही - हायकोर्ट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 22, 2018 6:00 AM

सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणाºया अपिलावर, गेल्या आठवड्यापासून दैनंदिन सुनावणी सुरू आहे.

मुंबई : सोहराबुद्दिन बनावट चकमक प्रकरणी वरिष्ठ आयपीएस अधिकाºयांच्या आरोपमुक्ततेला आव्हान देणाºया अपिलावर, गेल्या आठवड्यापासून दैनंदिन सुनावणी सुरू आहे. मात्र, सीबीआयकडून पुरेसे साहाय्य मिळत नसल्याने, अद्यापही त्यांची संपूर्ण केस आपल्यापुढे स्पष्ट झालेली नाही, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने सीबीआयच्या भूमिकेवर बुधवारी नाराजी व्यक्त केली.न्यायालयापुढे सीबीआयने अद्यापही संपूर्ण पुरावे सादर केले नाहीत. आरोपमुक्तता करण्यात आलेल्यांविरुद्ध जे प्रथमदर्शनी पुरावे नोंदविण्यात आले, तेही न्यायालयात सादर करण्यात आले नाहीत. न्यायालयासमोर सर्व पुरावे सादर करण्याचे कर्तव्य तपासयंत्रणेचे आहे. मी अद्यापही तपासयंत्रणेच्या संपूर्ण केसबद्दल गोंधळात आहे, अशा शब्दांत न्या. रेवती मोहिते-डेरे यांनी सीबीआयवर नाराजी दर्शविली.बुधवारी न्यायालयाने सीबीआयला सर्व साक्षीदारांचे जबाब सादर करण्याचे निर्देश दिले. मात्र, सीबीआय सुरुवातीपासूनच आपल्याकडे कागदपत्र नसल्याचे न्यायालयाला सांगून वेळ मारूननेत आहे.