नवी मुबई : सिडकोने स्पॅगेटी ते तळोजा मार्गावर नऊ कोटी रु पये खर्च करून उभारलेल्या रस्त्याला स्मशानभूमीच विघ्न आडव आल आहे त्यामुळे वाहन चालकांना रस्त्यातच मधोमध ब्रेक लावून वळण घेवून मार्गक्र मण करावे लागत आहे.सिडकोच्या चुकीच्या धोरणामुळे रांजणपाडा ग्रामस्थामध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.सिडकोने खारघर वसाहत निर्माण केल्यावर खारघर वासियासाठी सेक्टर चौदा येथे स्मशानभूमी उभारली.ओवा आणि खारघर ग्रामपंचायत मध्ये असलेल्या बेलपाडा,कोपरा,मुर्बी, पेठ,ओवे ,रांजणपाडा इत्यादी गावे आणि पाड्यात ग्राम पंचायत काळीन स्मशान भूमी आहेत .सिडकोने दोन वर्षापूर्वी नऊ कोटी रु पये खर्च करून खाडी किनारी असलेल्या स्पॅगेटी,रांजणपाडा ,ओवेपेठ ते तळोजा मार्गावर चार पदरी रस्ता तयार केला.रस्ता तयार करताना रांजनपाडा गावाच्या कडेला असलेल्या स्मशान भूमीला स्थलांतरित न करता रस्त्याचे काम तसेच सुरु ठेवले त्यामुळे स्मशानभूमी रस्त्याच्या मधोमध आल्यामुळे वाहनचालकांना वाहतुकीस अडथळा निर्माण होत आहे. शहराला रस्त्याची आवश्यकता असल्याने ग्रामस्थांनी विरोध न दर्शविता गावाच्या स्मशानभूमीसाठी इतर ठिकाणी भूखंड द्यावे अशी मागणी केली.मात्र सिडकोने कोणतेही विचार न करता गावाच्या स्मशानभूमी असलेल्या जागेतूनच रस्ता तयार केला .त्यामुळे गावात कोणी व्यक्ती मरण पावल्यास त्या व्यक्तीला अग्नी देण्यासाठी मुर्बी अथवा पेठ्गाव येथील स्मशान भूमी गाठावी लागते.
सिडकोच्या नऊ कोटीच्या रस्त्याला स्मशानभूमीचा विघ्न
By admin | Updated: August 25, 2014 00:27 IST