Join us

जादा फी घेतल्याने फातिमा हायस्कूलविरुद्ध गुन्हा

By admin | Published: June 25, 2017 3:40 AM

विविध उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क घेण्यात येत असल्याने घाटकोपर येथील फातिमा हायस्कूलविरुद्ध घाटकोपर पोलीस

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : विविध उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून मोठ्या प्रमाणात अतिरिक्त शुल्क घेण्यात येत असल्याने घाटकोपर येथील फातिमा हायस्कूलविरुद्ध घाटकोपर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ५ वर्षांपूर्वी एका पालकाने मानवी हक्क आयोगाकडे तक्रार केली होती. त्यांनी दिलेल्या निर्देशानुसार ही कारवाई करण्यात आली असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. विद्याविहार रेल्वे स्थानकाच्या पश्चिमेला फातिमा हायस्कूल आहे. शाळेत प्रवेश मिळविण्यासाठी विद्यार्थ्यांसह त्यांच्या पालकांना प्रयत्न करावे लागतात. गेल्या अनेक वर्षांपासून शाळेच्या प्रशासनाकडून एकूण शुल्क वगळता विविध खेळ आणि काही उपक्रमांच्या नावाखाली विद्यार्थ्यांकडून महिन्याला दीड ते दोन हजार घेत होते. त्याची कसलीही पावती विद्यार्थ्यांना दिली जात नव्हती. तसेच नवीन प्रवेशासाठीदेखील शाळेकडून मोठी रक्कम घेतली जात असे. त्याबाबत काही पालकांनी घाटकोपर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. मात्र त्या वेळी तात्पुरती कारवाई केली. त्यामुळे पालकांनी याबाबत मानवी हक्क आयोगाकडे तक्रार दाखल केली. गेली पाच वर्षे पालकांनी सातत्याने हा लढा सुरू ठेवल्याने अखेर मानवी हक्क आयोगानेदेखील याची दखल घेत संबंधित शाळेवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलिसांना दिले. त्यानुसार घाटकोपर पोलिसांनी पालकांचे जबाब नोंद करून शुक्रवारी शाळेविरोधात ‘कॅपिटेशन फी अ‍ॅक्ट’ अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.