करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2020 07:11 PM2020-05-22T19:11:56+5:302020-05-22T19:12:24+5:30

शिक्षण विभाग आणि युनिसेफकडून विद्यार्थ्यांसाठी महाकरिअर पोर्टलची सुरुवात

Careers information now with one click | करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर

करिअर्सची माहिती आता एका क्लिकवर

Next

 

मुंबई : लॉकडाऊनमुळे सुट्टीच्या काळात पुढे काय करायचे ? करिअरसंबंधी  पर्याय उपलब्ध आहेत ? कुठे आहेत याची चाचपणी करणारे विद्यार्थी घरी अडकून पडले आहेत. त्यातच  सध्या कोणत्या प्रवेश परीक्षा सुरु आहेत किंवा होणार आहेत ? कोणत्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत या सगळ्याची माहिती ही मिळविणे अवघड झाले आहे. यावर उपाय म्हणून  राज्याचा शिक्षण विभाग , युनिसेफ आणि राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषेदेच्या एकत्रित सहकार्याने नववी ते १२ विच्या विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र करियर गाईडन्स पोर्टलचे उद्घाटन करण्यात आले आहे. शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांच्या हस्ते उदघाटन झालेले हे पोर्टल २७ मे पासून विद्यार्थ्यांसाठी खुले होणार आहे.

विद्यार्थ्यांच्या सरल आयडीवरून ओपन होणाऱ्या या महाकरिअर पोर्टलवर विद्यार्थ्यांना करिअर निवडताना आधुनिक कोर्सेसची अत्यन्त उपयुक्त माहिती एकाच ठिकाणी एकाच क्लिकवर उपलब्ध होणार आहे. याचा उपयोग नववी ते १२वी इयत्तेतील तब्ब्ल ६६ लाख विद्यार्थ्यांना होऊ शकणार असल्याची माहिती शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या पोर्टलवर राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवरच्या ५५६ कोर्सेस व २१००० व्यावसायिक संस्था व महाविद्यालयाची माहिती दिली असून  कोर्सेसचा कालावधी, फी,प्रवेश परीक्षा, शिष्यवृत्ती, उपलब्ध नोकरी इत्यादी माहिती एकाच ठिकाणी उपलब्ध होणार असल्याची माहिती एमएससीआरटीचे संचालक दिनकर पाटील यांनी दिली.

मुला मुलींना आपले शिक्षण पूर्ण होताच कुटुंबाला हातभार लावावा लागतो,संधी व गरज विचारत घेऊन हे पोर्टल तयार केले असल्याचे टेरी डुरीयन, प्रमुख शिक्षण विभाग,युनिसेफ इंडिया यांनी सांगितले. शिक्षण घेताना संधी , योजना , शिष्यवृत्ती कोणत्या आहेत? कोणत्या मार्गाने निधी उभा करता येऊ शकतो हे सांगणारे पर्याय ही या पोर्टलवर असल्याची माहिती त्यांनी दिली. युनिसेफने आतापर्यंत देशाच्या आंध्रप्रदेश, बिहार , गुजरात , झारखंड, जम्मू कश्मीर, मध्य प्रदेश , राजस्थान अशा ७ राज्यांत करिअर पोर्टल सुरु करण्यास मदत केली असून आतापर्यंत १०. लक्ष विद्यार्थी त्यावर रजिस्टर आहेत तर ५९५५९ शिक्षकांना यासाठी प्रशिक्षण देण्यात आल्याची माहिती त्यांनी दिली.

Web Title: Careers information now with one click

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.